
Rafael Nadal Retirement: राफेल नदालने डेव्हिस कप स्पर्धेनंतर निवृत्ती घेईन अशी घोषणा केली होती. या स्पर्धेतील दिग्गज टेनिसपटू राफेल नदालचा निरोपाचा सामना भावनिक झाला. घरच्या मैदानावरील प्रेक्षकांसमोर स्टार टेनिसपटूनने आपला अंतिम सामना ४-६, ४-६ अशा फरकाने गमावला. उपांत्यपुर्व फेरीत नेदरलॅंड्सच्या बोटिक व्हॅन डी झांडस्चल्पकडून हा पराभव पत्कारावा लागला.