Corona Vaccination नियमावलीवर नदालची 'हेल्दी' प्रतिक्रिया

जे तज्ज्ञांना योग्य वाटते ते मान्य आहे, असे म्हणत त्याने नियमावलीचे पालन करण्याची तयारी दर्शवली आहे.
Nadal
Nadal File Photo
Updated on

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने (Rafael Nadal) ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपूर्वी कोरोना लसीकरणावर सावध भूमिका घेतलीये. ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना कोरोना लस घेणं बंधनकारक आहे. यासंदर्भात आयजकांनी खास नियमावली तयारी केली आहे. यासंदर्भात नदालला प्रश्न विचारण्यात आला होता. जे तज्ज्ञांना योग्य वाटते ते मान्य आहे, असे म्हणत त्याने नियमावलीचे पालन करण्याची तयारी दर्शवली आहे.

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या आयोजक समितीचे अध्यक्ष क्रेग टिली यांनी सर्व खेळाडूंनी कोविड ​​-19 प्रतिबंधक लस घेण अनिर्वाय असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे नदालला टक्कर देणार प्रतिस्पर्धी नोवाक जोकोविचच्या स्पर्धेतील सहभागावर संभ्रम निर्माण झाला आहे. टेनिस जगतातील नंबर वन खेळाडू असेलल्या जोकोविचनं लस घेतली आहे की नाही याबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही.

Nadal
भारतीय हॉकीची योग्य दिशेने वाटचाल; संदीप सिंग

कोरोना लस अनिवार्य करण्याच्या नियमावलीसंदर्भात नदाल म्हणाला की, ना मी या नियमावलीच्या बाजून आहे ना त्याच्या विरोधात. सध्याच्या घडीला मी केवळ आरोग्य संघटना जे काही सांगत आहेत त्याचे पालन करत आहे. आरोग्य क्षेत्रातील दिग्गजांपेक्षा मला अधिक कळत याचा मी अविर्भाव बाळगत नाही, असा उल्लेखही त्याने केलाय. जर आरोग्य क्षेत्रातील लोक लस घेतलीच पाहिजे या मताचे असतील तर यासंदर्भात वेगळ काही सांगणारा मी कोण? असा प्रश्न करत नदालने लस घेण अनिवार्य करण्याच्या मुद्याला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दर्शवला आहे.

Nadal
रोहितच्या अनुपस्थितीत कोहलीनं लावली फिल्डिंग? KL Rahul उप-कर्णधार!

दुखापतीमुळे ब्रेकवर असलेल्या 35 वर्षीय नदालने अबू धाबीच्या जागतिक टेनिस चॅम्पियनशिपच्या माध्यमातून कोर्टवर कमबॅक केले. दुखापतीमुळे मागील चार महिन्यांपासून तो टेनिस कोर्टपासून दूर आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्याला पाठदुखीचा त्रास उद्भवला होता. शुक्रवारी अबू-धाबीच्या कोर्टवर माजी नंबर वन अँडी मरेनं त्याला पराभूत केले. सामन्यात पराभव झाला असला तरी बऱ्याच दिवसांनी केलेली कामगिरी समाधानकारक होती, असे मतही त्याने व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com