डॉक्टर पत्नी अन् मराठी कनेक्शन; द्रविडच्या आयुष्यातील खास गोष्टी

राहुल द्रविड संदर्भात अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. पण...
Rahul Dravid And His Wife
Rahul Dravid And His WifeFile Photo
Updated on

Rahul Dravid Profile: भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) आता नवी इनिंग सुरु करतोय. भारतीय संघाचा सदस्य ते कर्णधार अशी भूमिका बजावल्यानंतर आता तो टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान झालाय. क्रिकेट जगतातील अनेक विक्रम आपल्या नावे असलेल्या राहुल द्रविड संदर्भात अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. पण काही अशा गोष्टीही असतील त्या कदाचित तुम्हाला माहित नसतील. जाणून घेऊयात राहुल द्रविडच्या पर्सनल लाईफमधील काही खास गोष्टी...

1. इंडियन क्रिकेट टीमची मजबूत भिंत अशी ओळख असलेल्या राहुल द्रविडचा जन्म 11 जानेवारी 1973 मध्ये मध्यप्रदेशमधील इंदुर शहरात (indore city) झाला. त्याचे बालपण याच शहरात गेले.

2. काही काळ इंदुरमध्ये राहिल्यानंतर राहुल द्रविडचे कुटुंबिय बंगळुरुला शिफ्ट झाले. द्रविडचे वडील एका कंपनीत काम करायचे. तर त्याच्या आई बंगळुरुतील विश्वेश्वराय कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये प्रोफेसर होत्या.

3. राहुल द्रविडसह त्याचे कुटंबिय अगदी साधे आहे. राहुल द्रविडने आपल्या प्रत्येक चाहत्याशी बोलावे. त्यांना भेटावे असे आई-वडीलांना वाटायचे. आई वडीलांची ही अपेक्षा पूर्ण करताना द्रविड कुटुंबियांना भलताच अनुभव आला होता. एक तरुणी भेटायला घरी आल्यानंतर ती घरून निघण्याचे नावच घेईना. हा किस्सा द्रविडने एका मुलाखतीमध्ये शेअर केला होता.

4. राहुल आणि विजेता यांच्या कुटुंबियात मैत्रीपूर्ण संबंध होते. विजेताचे वडील एअरफोर्समध्ये कार्यरत होते. 1968-1971मध्ये त्यांची पोस्टिंग बंगळुरुमध्ये झाली. या काळात द्रविडचे वडील आणि विजेता यांच्या कुटुंबियातील नाते अधिक घट्ट झाले. याच काळात राहुल आणि विजेता यांच्यातील मैत्री फुलली आणि त्याचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. दोन्ही कुटुंबिया मराठी भाषा ही सामान्य आहे. त्यामुळे नाते जोडण्यात फार अडचणी आल्या नाहीत.

5. राहुल द्रविडची पत्नी विजेता पेंढारकर पेशाने मेडिकल सर्जन आहे. 2003 मध्ये दोघांनी बंगळुरुमध्ये पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने विवाह केला होता. या स्वीट कपलला सुमित आणि अन्वय अशी दोन मुले आहेत. राहुल आणि विजेता यांचा विवाह लव्ह आणि अरेंज मॅरिज याचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com