द्रविड घेईल शास्त्री गुरुजींची जागा; माजी क्रिकेटरचा अंदाज

आता राहुल द्रविडने नियमितपणे हा पदभार सांभाळावा, अशा प्रतिक्रिया क्रिकेट वर्तुळातून रंगताना दिसत आहेत.
Rahul Dravid and Ravi Shastri
Rahul Dravid and Ravi Shastri Twitter
Updated on

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याच्यावकडे वनडे आणि टी-20 मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आलीये. त्यामुळे आता राहुल द्रविडने नियमितपणे हा पदभार सांभाळावा, अशा प्रतिक्रिया क्रिकेट वर्तुळातून रंगताना दिसत आहेत. टी-20 वर्ल्ड कपनंतर या वर्षाच्या अखेरीस रवि शास्त्री यांचा बीसीसीआयसोबतचा करार संपुष्टात येणार आहे. शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने उत्तम कामगिरी केली असली तरी आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळू शकतो, अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे. (Rahul Dravid Replace Ravi Shastri As Team India Next Head Coach Says Former All Indain Rounder Sodhi)

भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आणि अंडर 19 वर्ल्ड कप संघासोबत काम केलेल्या रितेंद्र सिंह सोधी यांनी यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. आगामी काळात राहुल द्रविड शास्त्रींची जागा घेईल, असे त्यांनी म्हटले आहे. श्रीलंका दौऱ्यावर राहुल द्रविडकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आलीये. त्यामुळे BCCI आगामी काळाची आतापासून तयारी करत असावे, असा अंदाजही त्यांनी वर्तवलाय.

Rahul Dravid and Ravi Shastri
किममुळे स्तनपान करणाऱ्या बाळांसाठी उघडला ऑलिम्पिकचा दरवाजा

सोधी यांनी एका न्यूज स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केले. ते म्हणाले की, रवि शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे, हे आपल्याला विसरुन चालणार नाही. पण त्यांचा करार लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांच्यानंतर राहुल द्रविड याच्याकडे मार्गदर्शनाची धूरा देणं योग्य पर्याय ठरु शकेल. जर तो मुख्य कोच म्हणून श्रीलंका दौऱ्यावर जात असेल तर तो आगामी काळात भारतीय संघाच्या मुख्य कोचच्या शर्यतीत असेल, याचेच संकेत मिळतात.जर रवि शास्त्रींची जागा कोणी घेऊ शकेल तर ते नाव राहुल द्रविडच असेल, असे ते म्हणाले.

Rahul Dravid and Ravi Shastri
Euro 2020 : युरो कप सुपर 4 जुगलबंदी

प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची कामगिरी चांगली राहिली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर 19 संघाने न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली आहे. भारत अ संघानेही त्याच्या मार्गदर्शनाखाली लक्षवेधी कामगिरी केलीय. सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धूरा सांभाळल्यानंतर द्रविडला आपण वेगवेगळ्या मुख्य भूमिकेत पाहत आहोत. त्याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड झाली. त्यामुळे सोढींना वाटते की, जर तात्पूरती भूमिका असती तर द्रविडने श्रीलंका दौऱ्यावर जाण्यास नकार दिला असता. दिग्गज खेळाडू कधीही तात्पूरता पर्याय निवडत नसतात. जर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षपदासंदर्भात बदल झाला तर राहुल द्रविडचे नाव आघाडीवर असेल, असे सोधींनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com