
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग या टी-२० स्पर्धेतील सोमवारच्या लढतींवर पावसाने पाणी फेरले. रायगड रॉयल्स-रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स-पीबीजी कोल्हापूर टस्कर्स आणि सातारा वॉरियर्स-पुणेरी बाप्पा या तीनही लढती रद्द करण्यात आल्या. यामुळे सहाही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.