esakal | IPL 2021, RRvsKKR : संजू इज बॅक! राजस्थानच्या बदलाचा 'रॉयल' प्रयोग 'यशस्वी'

बोलून बातमी शोधा

RR vs KKR

IPL 2021, RRvsKKR : संजू इज बॅक! राजस्थानच्या बदलाचा 'रॉयल' प्रयोग 'यशस्वी'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

IPL 2021 Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders 18th Match : महागडा गडी क्रिस मॉरिसचा भेदक मारा आणि त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने 41 चेंडूत केलेली नाबाद 42 धावांची खेळीच्या जोरावर राजस्थानच्या संघाने रॉयल विजय मिळवला. मुंबईतील वानखेडेच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सच्या संघासमोर 134 धावांचे आव्हान ठेवले होते. राजस्थान रॉयल्सने 6 विकेट राखून 19 व्या षटकातच सामना खिशात घातला. राजस्थान रॉयल्सने संघात दोन बदल केले होते. सलामीवीर मनन वोहराच्या जागी यशस्वी जयस्वालला संधी देण्यात आली होती. गोलंदाजीमध्ये जयदेव उनादकटला संघात स्थान देण्यात आले होते. राजस्थानचा बदलाचा हा प्रयोग यशस्वी ठरला. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. प्रसिद्ध कृष्णा आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट मिळवली.

क्रीडा क्षेत्रातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

बॅटिंगवेळी फलंदाजांकडून झालेले मिस कम्युनिकेशन आणि नावजलेल्या खेळाडूंनी फलंदाजीत केलेली निराशजनक कामगिरीमुळे पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या कोलकाताचा डाव 133 धावांत आटोपला. राहुल त्रिपाठीची 36 धावांची खेळी त्यांच्या इनिंगमधील सर्वोच्च खेळी ठरली. शुभमन गिल आणि इयॉन मॉर्गन यांची रन आउटच्या स्वरुपात पडलेल्या विकेटमुळे संघाच्या अडचणीत भर घातली. कोलकाताना निर्धारित 20 षटकात 9 बाद 133 धावा केल्या होत्या. राजस्थानकडून क्रिस मॉरिसने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

 • 133-9 : मॉरिसनं शिवम मावीला केलं बोल्ड

 • 133-8 : कमिन्स 6 चेंडूत 10 धावा करुन माघारी, मॉरिसला मिळाली विकेट

 • 118-7 : दिनेश कार्तिक 24 चेंडूत 25 धावा करुन माघारी

 • 117-6 : क्रिस मॉरिसने आंद्र रसेलला स्वस्तात आवरले

 • 94-5 : 26 चेंडूत 36 धावा करुन कार्तिक परतला, मुस्तफिझूरला मिळाले यश

 • 61-4 : इयॉन मॉर्गनला खातेही उघडता आले नाही, क्रिस मॉरिसने केले रन आउट

 • 54-3 : उनादकटने सुनील नरेन याला अवघ्या 6 धावांवर धाडले माघारी

 • 45-2 : चेतन सकारियानं सलामीवीर नितीश राणाची केली शिकार, 25 चेंडूत 22 धावा करुन तो सॅमसनच्या हाती झेल देऊन परतला

 • 24-1 : शुभमन गिलचा फ्लॉप शो जारी, जोस बटलरने 11 धावांवर केलं रन आउट

 • Rajasthan Royals (Playing XI): जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), डेविड मिलर, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, चेतन सकारिया, मुस्तफिझूर रहमान.

 • Kolkata Knight Riders (Playing XI): नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुनील नरेन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी, प्रसिद्ध कृष्णा.

 • टॉस जिंकून संजूनं घेतली फिल्डिंग