Fri, Jan 27, 2023

Rajiv Gandhi Urban Olympic : राजीव गांधी ऑलिंपिकचे राजस्थानमध्ये आयोजन
Published on : 22 December 2022, 7:16 pm
जयपूर : राजस्थानमधील सत्ताधारी अशोक गेहलोत यांच्या काँग्रेस सरकारने २६ जानेवारीपासून राजीव गांधी नागरी ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात सात क्रीडाप्रकारांचा समावेश असेल. सर्व वयोगटांमधील स्पर्धक त्यात भाग घेऊ शकतील.
कबड्डी, टेनिस चेंडूवरील क्रिकेट, खो-खो, व्हॉलिबॉल, अॅथलेटीक्स, फुटबॉल आणि बास्केटबॉल अशा खेळांचा यात समावेश आहे. अॅथलेटीक्समध्ये १००, २०० आणि ४०० मीटर धावण्याच्या शर्यती होतील. याआधी ग्रामीण ऑलिंपिकचे आयोजन करण्यात आले होते. आता हे ऑलिंपिक १० महानगरपालिकांसह राज्यातील २४० नागरी केंद्रामध्ये होईल.
चंदना यांनी सांगितले की, ग्रामीण ऑलिंपिकमध्ये ३० लाखाहून जास्त खेळाडूंनी भाग घेतला. ही स्पर्धा विश्वविक्रमी ठरली. राज्यात सामाजिक सलोखा नांदावा म्हणून या स्पर्धेमुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले.