Maharashtra Boxing Championship 2023 : कात्रजच्या राजवीरला 'बॉक्सिंग'मध्ये सुवर्णपदक

'९ व्या सब ज्युनिअर बॅाईज महाराष्ट्र स्टेट बॅाक्सिंग चॅम्पियनशिप २०२३-२४'मध्ये पुणे सिटी संघाच्या राजवीर अमित सूर्यवंशीने चुरशीच्या लढतीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले
Maharashtra Boxing Championship 2023
Maharashtra Boxing Championship 2023Sakal

कात्रज : महाराष्ट्र बॅाक्सिंग असोसिएशन आणि ॲमॅच्युअर बॅाक्सिंग असोसिएशन (नागपुर जिल्हा) यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या '९ व्या सब ज्युनिअर बॅाईज महाराष्ट्र स्टेट बॅाक्सिंग चॅम्पियनशिप २०२३-२४'मध्ये पुणे सिटी संघाच्या राजवीर अमित सूर्यवंशीने चुरशीच्या लढतीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. राजवीर हा कात्रजमधील भारती विद्यापीठ परिसरातील रहिवाशी आहे.

१४ वर्षाखालील वयोगट असलेल्या या स्पर्धेत राजवीर अमित सुर्यवंशी याने ४९-५२ या वजनगटात पुणे सिटीचे प्रतिनिधीत्व केले. एमआयजीएस क्लबचे प्रशिक्षक उमेश जगदाळे, राष्ट्रीय खेळाडू मृणाल भोसले आणि रोहन जगदाळे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. ही स्पर्धा २२ ते २६ जुलै दरम्यान नागपुर येथे पार पडली. या यशाबद्दल रजविरचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com