Ranji Trophy : रणजी ट्रॉफीतही दोन दिवसात खेळ खल्लास! दोन सामने संपले दोन दिवसात

Ranji Trophy 2022 - 23 Meghalaya vs Sikkim
Ranji Trophy 2022 - 23 Meghalaya vs Sikkimesakal

Ranji Trophy 2022 - 23 Meghalaya vs Sikkim : रणजी ट्रॉफी 2022 - 23 मध्ये आज बऱ्याच राज्यांच्या सामन्याचा दुसरा दिवस संपुष्टात आला. त्यामुळे सामन्याचा निकाल लागलण्याची शक्यता तशी फारशी नव्हती. मात्र या सर्वाला मेघालय विरूद्ध सिक्कीम हा सामना अपवाद ठरला. या सामन्याचा अवघ्या दोन दिवसात निकाल लागला. ऑस्ट्रेलियात गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या दोन दिवसात गुंडाळले होते. यानंतर गाबा कसोटीतील खेळपट्टीवर तुफान टीका झाली. आता रणजी ट्रॉफीमध्ये देखील असाच दोन दिवसात खेळ संपलेल्या दोन कसोटी खेळल्या गेल्या.

मध्य प्रदेश विरूद्ध चंदीगड हा सामना देखील दोन दिवसात संपला. मध्यप्रदेशने प्रथम फलंदाजी करत 309 धावा केल्या. त्यानंतर मध्य प्रदेशने चंदीगडला 57 धावात संपले. फॉलोऑन देत दुसरा डाव देखील 127 धावात गुंडाळला. मेघालय विरूद्ध सिक्कीम देखील सामना असाच दोन दिवसात संपला.

Ranji Trophy 2022 - 23 Meghalaya vs Sikkim
IPL 2023 Auction : कोण मोडू शकतो ख्रिस मॉरिसचे रेकॉर्ड, स्टोक्स की सॅम?

मेघालय विरूद्ध सिक्कीम रणजी ट्रॉफी सामन्यात सिक्कीमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मेघालयाने त्यांचा पहिला डाव 59 षटकात 140 धावात संपवला. मेघालयकडून राजेश बिश्नोईने 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर सिक्कीमने मेघालयचा पहिला डाव 45.5 षटकात 153 धावात संपवला. सिक्कीमकडून पालझोर तमांगने मेघालयचा निम्मा संघ गारद केला. मेघालयने पहिल्या डावात अवघ्या 13 धावांची आघाडी घेतली.

Ranji Trophy 2022 - 23 Meghalaya vs Sikkim
Ranji Trophy Ajinkya Rahane : अजिंक्यने IPL लिलावासाठी थोपटले दंड; ठोकले द्विशतक

दुसऱ्या डावात मेघालयाने सिक्कीमला 90 धावात गुंडाळत सामन्यावर पकड निर्माण केली. मेघालयकडून राजेश बिश्नोईने 5 तर दिप्पू संगमाने 4 विकेट्स घेतल्या. मेघालयने विजयासाठीचे 77 धावांचे आव्हान 8 षटकात पार करत सामना दुसऱ्या दिवशीच संपवला. मेघालयकडून राज बिस्वाने 32 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी केली. संपूर्ण सामन्यातील हे पहिले अर्धशतक होते.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com