अवघ्या 7 धावांनी हुकले द्विशतक...! भारतीय निवडसमितीने दुर्लक्ष केलेल्या खेळाडूंची षटकार-चौकारची आतषबाजी

ranji trophy-2024 devdutt paddikal-hits-century-against-punjab-playing-for-karnataka cricket news in marathi kgm00
ranji trophy-2024 devdutt paddikal-hits-century-against-punjab-playing-for-karnataka cricket news in marathi kgm00

Ranji Trophy 2024 Devdutt Paddikal : आता सध्या भारतात रणजी ट्रॉफीचा थरार सुरू आहे. आणि टीम इंडियातून बाहेर असलेले अनेक खेळाडू स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या देवदत्त पडिकलने शानदार षटकार-चौकारची आतषबाजी केली. आणि रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्ध कर्नाटककडून फलंदाजी करताना 24 चौकार आणि 4 षटकारांसह 216 चेंडूत 193 धावा केल्या.

पंजाबने नाणेफेक जिंकून कर्नाटकविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा संघ केवळ 152 धावा करू शकला. कर्नाटककडून सलामीला आलेला मयांक अग्रवाल फ्लॉप ठरला. आणि केवळ 0 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर पडिकल यांनी डावाची धुरा सांभाळली. आणि कर्नाटकसाठी त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले.

कर्नाटककडून खेळणाऱ्या देवदत्त पडिकलने गेल्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्येही चमकदार कामगिरी केली होती. पहिल्या पाच सामन्यांतील पाच डावांमध्ये दोनदा नाबाद राहताना त्याने 465 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतकांचाही समावेश आहे. पण या सामन्यात त्याचे अवघ्या 7 धावांनी द्विशतक हुकले. तो 193 धावा करू बाद झाला.

देवदत्त पडिकलने भारताकडून 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मात्र खराब कामगिरीमुळे त्याला दुसरी संधी मिळाली नाही. 2 सामन्यांत त्याच्या बॅटमधून फक्त 38 धावा झाल्या. ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 29 होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com