Ranji Trophy 2024 : बिहारचा सचिन! अवघ्या 14 व्या वर्षी रणजी पदार्पण, मात्र वय सापडलं वादाच्या भोवऱ्यात

Ranji Trophy 2024
Ranji Trophy 2024esakal

Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफी 2024 चा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. भारतीय क्रिकेट वर्तुळातील दिग्गज नावं मैदानावर आपले दंड थोपटत आहेत. मात्र या सर्वांमध्ये बिहारच्या एका मुलाची जोरदार चर्चा आहे. वयाच्या 14 व्या वर्षी त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.

बिहारचा संघ घरच्या मोईनुल हक स्टेडियमवर मुंबईविरूद्ध रणजी ट्रॉफीचा सामना खेळत आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने आपले प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पण केलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ज्यावेळी मुंबईकडून रणजी पदार्पण केलं होतं त्यावेळी सचिनचं वय हे 15 वर्षे आणि 232 दिवस होत. वैभवने त्यापेक्षा कमी वयात रणजी पदार्पण केलं आहे.

वैभवच्या वयावरून वाद

वैभव सूर्यवंशीचे नेमकं वय किती याबाबत संभ्रम आहे. बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटनुसार वैभवचे वय 12 वर्षे 9 महिने आणि 10 दिवस आहे. इएसपीएन क्रिकइन्फोवर देखील त्याचं वय हे 12 वर्षेच दाखवण्यात आलं आहे. मात्र वैभवच्या जुन्या इंटरव्ह्यूमध्ये तो 14 वर्षाचा असल्याचं समोर आलं आहे.

हा इंटरव्ह्यू जवळपास 8 महिने जुना आहे. त्यावेळी तो 27 डिसेंबरला 14 वर्षाचा होणार असल्यांच सांगतोय. त्यानुसार रणजी पदार्पण करताना वैभवचं वय 14 वर्षे 3 महिने आणि 9 दिवस आहे.

भारताकडून 19 वर्षाखालील संघातही खेळलाय वैभव

वैभव नुकत्याच झालेल्या 19 वर्षाखालील स्पर्धेत भारताकडून खेळला होता. ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती. त्यात चार संघांनी सहभाग नोंदवला होता. यात भारताशिवाय इंग्लंड, बांगलादेश या संघाचा देखील समावेश होता. वैभव सूर्यवंशीने या स्पर्धेत पाच सामन्यात 177 धावा केल्या होत्या. त्यात दोन अर्धशतकी खेळींचा देखील समावेश होता.

सूर्यवंशीने विनू मंकड ट्रॉफी 2023 मध्ये दमदार कामगिरी केली. त्याने पाच सामन्यात 393 धावा केल्या आहेत. तो या स्पर्धेत आठव्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने बिहारच्या 19 वर्षाखालील संघातकडून खेळताना झारखंडविरूद्ध कूच बिहार ट्रॉफीत 151 आणि 76 धावांची खेळी केली होती.

डावखुरा सलामीवीर वैभव

वैभव सूर्यवंशी हा डावखुरा सलामीवीर आहे. तो बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील आहे. त्याने वयाच्या सहाव्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरूवात केली. तो सातव्या वर्षी एका क्रिकेट अकॅडमीत सामील झाला होता. ही अकॅडमी माजी रणजीपटू मनिष ओझांची होती.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com