Ranji Trophy : ममता बॅनर्जींच्या क्रीडा मंत्र्याचे रणजी ट्रॉफीत शतक

Ranji Trophy Bengal Sports Minister Manoj Tiwary Scored Hundred In Quarter Final
Ranji Trophy Bengal Sports Minister Manoj Tiwary Scored Hundred In Quarter Final esakal

कोलकाता : भारताचा माजी फलंदाज आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळात क्रीडा मंत्रालय सांभाळणाऱ्या मनोज तिवारीने रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायलन सामन्यात शतकी खेळी केली. बंगुळूरू येथे झारखंड विरूद्ध सुरू असलेल्या सामन्यात त्याने ही शतकी खेळी केली आहे. मनोज तिवारीने 152 चेंडूत शतकी खेळी केली. त्यात 14 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तिवारी सामन्याच्या पाचव्या दिवशी फलंदाजीला आला होता. त्यावेळी दुसऱ्या डावात बंगालची अवस्था चार बाद 129 धावा अशी झाली होती. त्यानंतर त्याने आणि अभिषेक पोरेलने 72 धावांची भागीदारी रचली. (Ranji Trophy Bengal Sports Minister Manoj Tiwary Scored Hundred In Quarter Final)

Ranji Trophy Bengal Sports Minister Manoj Tiwary Scored Hundred In Quarter Final
पैगंबर वाद : शोएब अख्तरने भारत सरकारच्या निर्णयाचे केले स्वागत

यानंतर अभिषेकला शाहबाज नदीमने 34 धावांवर बाद केले. मनोज तिवारीने 136 धावा केल्या. तो धावबाद झाला. यापूर्वी बंगालने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 7 बाद 773 धावा केल्या होत्या. सुदीप कुमार घारमी आणि अनुस्तूप मुजूमदारने शतकी खेळी केली. तर इतर सात फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. यात मनोज तिवारीचा देखील समावेश होता.

Ranji Trophy Bengal Sports Minister Manoj Tiwary Scored Hundred In Quarter Final
IPL Media Rights :बेझोस यांची माघार, मुकेश अंबानींची दावेदारी होणार प्रबळ?

तिवारी नंतर अभिषेक पोरेल, शाहबाज अहमद, सयान मोंडल आणि आकाश दीप यांनी देखील अर्धशतकी खेळी केली. झारखंडकडून मिश्राने तीन विकटे घेतल्या तर नदीमने दोन विकेट घेतल्या. झारखंडचा पहिला डाव 298 धावात संपुष्टात आला. झारखंडकडून विराट सिंगने नाबाद 113 धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात बंगालने 7 बाद 318 धावा केल्या. अखेर सामना अनिर्णित राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com