
Sidhu Moose Wala स्टाईलमध्ये सर्फराजचं 'शतकी' सेलिब्रेशन
सरफराजने बंगळुरू येथे रणजी ट्रॉफी 2022 फायनलमध्ये मध्य प्रदेश विरुद्ध पहिल्या डावात शानदार 134 धावा केल्या. रणजी ट्रॉफी 2021-22 मध्ये सरफराज खानचे हे चौथे शतक होते. शतक झळकावल्यानंतर सर्फराज भावूक झाला. नंतर त्याने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शतक केल्यानंतर सरफराजने पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या 'थप्पी' सिग्नेचर स्टेपची कॉपी केली. सरफराजने आधी मांडी मारली आणि नंतर एका बोटाने आकाशाकडे इशारा केला. तरीही सर्फराजसाठी हा भावनिक क्षण होता.
सर्फराज खानने रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये शतक झळकावण्यापूर्वी सौराष्ट्रविरुद्ध २७५ धावा, उत्तराखंड (१५३ धावा) आणि ओडिशाविरुद्ध १६५ धावा केल्या होत्या. सरफराज खान रणजी ट्रॉफी 2021-22 मध्ये आतापर्यंत 8 डावात 937 धावा करणारा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. यादरम्यान सर्फराजची सरासरी १३३.८५ असून त्याने चार शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेताना मुंबईचा पहिला डाव 374 धावांत आटोपला. सरफराजशिवाय यशस्वी जैस्वालने 78 आणि पृथ्वी शॉने 47 धावांचे योगदान दिले. पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात केली. एमपीसाठी गौरव यादवने चार आणि अनुभव अग्रवालने तीन गडी बाद केले.
पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कॅनडाचा गँगस्टर गोल्डी ब्रार याने सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतली आहे. या संपूर्ण कटामागे लॉरेन्स बिश्नोईची गँगस्टर टीम आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीच्या तुरुंगात आहेत.
Web Title: Ranji Trophy Final Teary Eyed Sarfaraz Khan Celebrates Ton In Sidhu Moose Wala Style
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..