Ranji Trophy: रणजी ट्रॉफीचा सामना 5 दिवसांऐवजी 4 दिवसांचा! हे आहे त्याच्या मागचं मोठं कारण

Ranji Trophy
Ranji Trophy

Ranji Trophy : रणजी ट्रॉफीचे नाव ऐकल्यानंतर सर्वात प्रथम लक्षात येते ते पांढऱ्या कपड्यांमध्ये कसोटी सामने खेळणारे खेळाडू. तुमचाही असा विचार असेल तर तुम्ही अगदी बरोबर आहात आणि खर्‍या अर्थाने क्रिकेटचे चाहते आहात. रणजी करंडक ही बीसीसीआयची प्रथम श्रेणी लीग आहे जिथे खेळाडूंची खरी परीक्षा असते. याची सुरुवात 1934-35 मध्ये झाली आणि यावेळी 88वी आवृत्ती खेळली जात आहे.

Ranji Trophy
IND vs NZ ODI: न्यूझीलंड क्रिकेटला नवा चेहरा! विल्यमसन, साऊदीविना किवी संघ भारतात

रणजी करंडक ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा आहे. या प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत पात्र ठरलेल्या कोणत्याही खेळाडूला भारताकडून खेळण्याची संधी मिळते. येथे कर्णधार आणि निवड समितीसह भारतीय प्रशिक्षकाची नजर धावा करणाऱ्या आणि विकेट्स घेणाऱ्यांवर असते. तसे टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठीच नाही, तर बाहेर पडल्यानंतर संघात पुनरागमन करण्याचा मार्गही या स्पर्धेतून जातो.

Ranji Trophy
Suryakumar Yadav : सूर्यामुळे मुंबईची ताकद वाढणार! आजपासून हैदराबादशी लढत

क्रिकेटमधील कोणत्याही फॉरमॅटमध्ये सामना कधी संपेल हे कोणालाच माहीत नसले तरी प्रत्येक फॉरमॅटसाठी एक निश्चित वेळ करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे आयसीसीने आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वेळ निश्चित केली आहे, त्याचप्रमाणे रणजी ट्रॉफीचे सामने 4 आणि 5 दिवसांचे खेळवले जातात. आता तुम्ही विचार कराल की कोणता सामना 4 दिवस आणि कोणता 5 दिवस खेळला जातो. एवढी काळजी करण्याची गरज नाही कारण बीसीसीआयने रणजी गटातील सामन्यांसाठी 4 दिवस तर बाद फेरीसाठी 5 दिवस निश्चित केले आहेत.

Ranji Trophy
Lionel Messi: 'आता विश्वविजेता म्हणून खेळायचंय' मेस्सी करतोय विचार...

यावेळी ही स्पर्धा 13 डिसेंबर ते 20 फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. 13 डिसेंबर ते 24 जानेवारी दरम्यान गट सामने खेळवले जाणार आहेत. या सर्व स्पर्धा 4 दिवस चालणार आहेत. कोणत्याही सामन्याचा निकाल याआधीच कळू शकतो. नॉकआऊट सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर चार उपांत्यपूर्व फेरीचे सामने 31 जानेवारीपासून खेळवले जातील आणि त्यानंतर 8 फेब्रुवारीला उपांत्य फेरी आणि 16 फेब्रुवारीपासून अंतिम फेरीचे सामने होतील. सर्व बाद फेरीचे सामने 5 दिवस चालतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com