
BCCIच्या एका घोषणेने पुजारा - रहाणेला मिळाली शेवटची संधी?
भारतीय कसोटी संघातील दोन वरिष्ठ खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर फारशी संधी मिळाली नाही. त्यातच दौऱ्यापूर्वीच अजिंक्य रहाणेचे उपकर्णधार पदही गेले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौरा हा त्यांच्या कारकिर्दितला शेवटचा कसोटी (Test Cricket) दौरा असेल असे जाणकारांचे मत होते. मात्र आता बीसीसीआयच्या (BCCI) एका घोषणेमुळे पुजारा आणि रहाणेला शेवटची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा: Video: मोईन खानच्या पोरानं आफ्रिदीला चांगलाच धुतला
बीसीसीआयने रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) वेळापत्रकाची घोषणा नुकती केली. रणजी ट्रॉफी हंगामाचा पहिला भाग हा आयपीएल पूर्वी 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील कसोटी मालिका मार्च महिन्यात खेळली जाणार आहे. तोपर्यंत रणजी ट्रॉफीतील एलिट ग्रुपचे निदान दोन सामने होतील. हीच चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेकडे स्वतःला सिद्ध करण्याची शेवटची संधी असणार आहे.
एलिट ग्रुपचे सामने हे १६ फेब्रुवारीपासून सुरू होतील. त्यामुळे या दोघांनीही निवडसमितीला प्रसन्न करून घेण्यासाठी 2 सामने म्हणजे जवळपास चार डाव मिळतील. विशेष म्हणजे रहाणे खेळत असलेली मुंबई आणि पुजारा खेळत असलेला सौराष्ट्र (Mumbai vs Saurashtra) हे दोन्ही संघ अहमदाबादमध्ये एकमेकांना भिडणार आहेत.
हेही वाचा: Viral Video: धोतरातल्या आबांचा 'उत्साह' विराटलाही लाजवणारा
दरम्यान, मुंबईचे प्रशिक्षक अमोल मुजूमदार (Amol Mujumdar) यांनी पीटीआयआशी बोलताना सांगितले की, 'अजिंक्य रहाणे याकडे नक्कीच एक मोठी संधी म्हणून पाहील. आम्ही काही वेळी भेटलो आहे. तो मुंबई संघाबरोबर सराव करत आहे. नेटमध्ये तो चांगल्या लयीत दिसत आहे. आम्हाला आताच भविष्याबाबत फार विचार करण्याची गरज नाही. मात्र या दोघांना मोठी संधी मिळाली आहे. मला वाटते की हा फक्त आत्मविश्वासाचा विषय आहे. कधी कधी फलंदाजीत फक्त आत्मविश्वासाची गरज असते. हा आत्मविश्वास फक्त मोठा शंभर करूनच येतो.' बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीला (Sourav Ganguly) देखील पुजारा आणि रहाणेकडून रणजी ट्रॉफीत मोठ्या धावांची अपेक्षा आहे.
रहाणे आणि पुजाराच्या खेळीत सातत्य नसल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. अनेक जाणकारांच्या मते आता भारतीय कसोटी संघात या दोन वरिष्ठ खेळाडूंच्या जागी नव्या युवा खेळाडूंना संधी दिली पाहिजे.
Web Title: Ranji Trophy Is A Last Chance For Cheteshwar Pujara And Ajinkya Rahane For Prove Form To Selectors
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..