Ranji Trophy 2022 Final Day 1: मध्यप्रदेशविरुद्ध मुंबईचे फलंदाज चमकले, पहिल्या दिवशी 248/5 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ranji trophy

Ranji Trophy Final: मध्यप्रदेशविरुद्ध मुंबईचे फलंदाज चमकले, पहिल्या दिवशी 248/5

रणजी ट्रॉफी 2021-22 हंगामाचा अंतिम सामना मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात खेळला जात आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होत आहे. मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशचा संघ 88 वर्षांत दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 23 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशच्या संघाला कर्नाटककडून पराभव स्वीकारावा लागला होता. रणजी ट्रॉफी फायनलच्या पहिल्या दिवशी मुंबईने 5 गड्यांच्या मोबदल्यात 248 धावा केल्या आहेत.

हेही वाचा: MS Dhoni च्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ, कारण काय?

मुंबईकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 78 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार पृथ्वी शॉने 47 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईचा सरफराज खान 40 आणि शम्स मुलानी 12 धावा करून खेळत आहेत. मध्य प्रदेशकडून सर्शन जैन आणि अनुभव अग्रवाल यांनी प्रत्येकी दोन तर सर्शन जैनने एक गडी बाद केला.

Web Title: Ranji Trophy Mumbai Vs Madhya Pradesh Final Live Updates And Score Day 1 Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ranji Trophy
go to top