राशिद खानने मोडला 15 वर्षांपूर्वीचा हा 'युनिक' विक्रम

वृत्तसंस्था
Thursday, 5 September 2019

राशिद खानच्या नावावर यापूर्वी अनेक विक्रमांची नोंद असताना आज त्याने आणखी एक विक्रम केला. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत लहान कर्णधार होण्याचा विक्रम रचला आहे.

छट्टोग्राम : राशिद खानच्या नावावर यापूर्वी अनेक विक्रमांची नोंद असताना आज त्याने आणखी एक विक्रम केला. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत लहान कर्णधार होण्याचा विक्रम रचला आहे. यासह त्याने 15 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहेय यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत कमी वयात कर्णधार होण्याचा मान झिंबाब्वेच्या तातेंदा तैबू याने मिळवला होता. 

''कसोटी क्रिकमध्ये एवढ्या कमी वयात संघाचे नेतृत्व करण्याचा मान मिळल्याचा मला अभिमान आहे. मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.बांगलादेशच्या संघाचा मायदेशात चांगला रेकॉर्ड आहे. आमचीसुद्ध अबू धाबीमध्ये चांगली तयारी झाली आहे. आम्ही प्रत्येक आघाडीवर 100 टक्के देण्याचा प्रयत्न करु,'' अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

असघर अफगाणला हटवीन त्याच्याजागी रहमत शहाला कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपद देण्यात आले. मात्र, त्याने कर्णधार म्हणून एकही सामना खेळण्यापूर्वीच रशिदला कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rashid Khan Becomes Youngest Player To Lead A Test Team