Sharad Pawar: कुस्तीगीर परिषदेत शरद पवारांना धक्का; भाजपचा उमेदवार होणार अध्यक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवार

कुस्तीगीर परिषदेत शरद पवारांना धक्का; भाजपचा उमेदवार होणार अध्यक्ष

मुंबई : काही दिवसांपूर्वी शरद पवार हे अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली होती. भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता यासाठी निवडणुका होणार असून भाजपचे रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुका पार पडत असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीन जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी दोन जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे. काकासाहेब पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील यांनी आपले अर्ज मागे घेतले असून रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार आहे.

हेही वाचा: जालन्याचं वैर दिल्लीत संपणार? दानवे-खोतकरांची दीड तास खलबतं

दरम्यान, याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून कोणत्याही स्पर्धेचे आयोजन करण्यात येत नसल्यामुळे बरखास्त करण्यात आल्याचं भारतीय कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितलं होतं.

आम्ही १५ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन त्यांना करायला सांगत होतो, पण ऐनवेळी त्यांनी यासाठी नकार दिला. तसेच २०१९ मध्ये २३ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन करण्यासही ते तयार नव्हते असं तोमर म्हणाले होते. त्यानंतर आता पुन्हा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका पार पडत आहेत.

Web Title: Rashtriya Kustigir Parishad Election Sharad Pawar Bjp Candidate

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top