'ब्रेकची काय गरज...', शास्त्री राहुल द्रविडवर भडकले : Ravi Shastri on Rahul Dravid | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi Shastri on Rahul Dravid

Ravi Shastri : 'ब्रेकची काय गरज...', शास्त्री राहुल द्रविडवर भडकले

Ravi Shastri on Rahul Dravid : भारतीय संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना तीन सामन्यांच्या वनडे आणि टी-20 मालिकेत खेळायची आहे. या दौऱ्यासाठी कर्णधार रोहित शर्मासह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पांड्या टी-20 आणि शिखर धवन वनडे मालिकेत संघाचे नेतृत्व करणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेही ब्रेक घेतला आहे. द्रविडच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण संघासह न्यूझीलंडला प्रशिक्षक म्हणून गेला आहे.

हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

खेळाडूंसोबतच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नाराजी व्यक्त केली. टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफला सतत ब्रेक देण्याच्या निर्णयावर त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. द्रविड आणि त्याच्या सहकाऱ्यांना विश्रांती देण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला लक्ष्मण भारताच्या झिम्बाब्वे आणि आयर्लंड दौऱ्यात भारताचे प्रशिक्षक होते. 

हेही वाचा: FIFA World Cup Prize Money: चेष्टाच! 32व्या क्रमांकाचा संघ होणार टी-20 विश्वविजेत्या पेक्षा सहा पटीने मालामाल

भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून शास्त्री सतत सक्रिय होते. भारताचा मुख्य संघ असो वा ब संघ, शास्त्री नेहमी आपल्या खेळाडूंसोबत राहत होते. वेलिंग्टनमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेपूर्वी शास्त्री म्हणाले की, मी विश्रांती घेण्यावर विश्वास ठेवत नाही. कारण मला माझ्या खेळाडूंना समजून घ्यायचे आहे. त्यामुळे इतक्या विश्रांतीची गरज का आहे? तुम्हाला आयपीएल दरम्यान दोन ते तीन महिने मिळतात, प्रशिक्षक म्हणून विश्रांती घेण्यासाठी पुरेसे आहे. पण बाकीच्या वेळेस प्रशिक्षक कोणीही असो, संघासोबत असले पाहिजे असे मला वाटते.