Ind vs Nz World Cup : 'आत्ता विजेतेपद मिळवले नाही, तर पुढच्या तीन...' भारतीय दिग्गजाचे मोठे वक्तव्य

विश्वकप 2023: भारताच्या विजेतेपदाच्या दुष्काळाची सुवर्णसंधी
Ravi Shastri issues warning ahead of World Cup semi final clash team india against New Zealand
Ravi Shastri issues warning ahead of World Cup semi final clash team india against New ZealandEsakal

India VS New Zealand World Cup 2023 semi final :

भारतीय संघातील खेळाडू सध्या कमालीचे फॉर्मात आहेत आणि लौकिकाप्रमाणे भरीव कामगिरीही करत आहे. त्यामुळे या वेळी विश्वकरंडक विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची ही सुवर्णसंधी आहे. आत्ता विजेतेपद मिळवले नाही, तर पुढच्या तीन स्पर्धापर्यंत वाट पाहावी लागेल, असे मत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

Ravi Shastri issues warning ahead of World Cup semi final clash team india against New Zealand
Rohit Sharma : गांगुली, धोनीसारख्या दिग्गज कर्णधारांना जमलं नाही ते रोहितने करून दाखवलं; पाहा Video

एका कार्यक्रमात बोलताना शास्त्री यांनी हे विधान केले. त्या कार्यक्रमात अॅडम गिलख्रिस्ट आणि मायेकल वॉनसुद्धा उपस्थित होते. भारताने विश्वकरंडक जिंकून आता एक तप उलटले आहे. १२ वर्षांपूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वकरंडक जिंकला, तेव्हा देशात उत्साहाचे वातावरण संचारले होते. तोच योग यंदा परत येऊ शकतो. ज्या प्रकारे संपूर्ण स्पर्धेत खेळ करण्यात येत आहे, ते पाहता या वेळी सर्वोत्तम संधी आहे; पण या वेळी संधी हुकली, तर पुढे काही काळ वाट पुन्हा वाट पाहावी लागेल, असे शास्त्री यांनी म्हटले आहे.

रवी शास्त्री यांनी भारतीय गोलंदाजीचे तोंडभर कौतुक केले. आत्तापर्यंतचा हा सर्वोत्तम ताफा असल्याचे सांगत शास्त्री यांनी परिस्थितीनुसार खेळ करण्याची क्षमता आणि सातत्य याला महत्त्व दिले.

Ravi Shastri issues warning ahead of World Cup semi final clash team india against New Zealand
David Willey Retirement: वर्ल्ड कपच्या शेवटच्या सामन्यात सर्वोत्तम तरी... दिग्गज खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि शमी यांच्या साथीला असलेले रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे प्रतिस्पर्ध्याची भंबेरी उडवत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्वांचा रोख बरोबर यष्टींच्या दिशेने असतो. मर्यादित षटकांचे क्रिकेट सुरू झाल्यापासून गेल्या ५० वर्षांतील भारताचा हा सर्वोत्तम गोलंदाजीचा ताफा असल्याचे कौतुक शास्त्री यांनी केले.

यंदाच्या स्पर्धेत साखळीतील सर्व नऊ सामने जिंकून भारताने अपराजित राहण्याची कामगिरी केली आणि सर्वांच्या अगोदर उपांत्य फेरी निश्चित केली. आता बुधवारी भारताचा उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होत आहे. विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ भारतासाठी डोकेदुखी ठरत असला, तरी यंदाच्या साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडवर मात केलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com