ravi shastri on virat kohli
ravi shastri on virat kohlisakal

Virat Kohli Asia Cup 2022 : 'सगळ्यांची तोंडे बंद होणार..', शास्त्रींचे कोहलीवर मोठे वक्तव्य

विराट कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते तेव्हापासून तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये धावा काढण्यासाठी धडपडत आहे.
Published on

Asia Cup 2022 : भारतीय संघ आशिया कपमध्ये पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. कोहलीने इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला आणि तेव्हापासून तो मैदानापासून दूर आहे. मात्र, इंग्लंड दौऱ्यानंतर विराट कोहली महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुनरागमन करत आहे. 28 ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडिया आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध खेळेल तेव्हा सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील.

ravi shastri on virat kohli
Asia Cup 2022: भारत पाकिस्तान मॅच कधी? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंग, प्लेइंग 11 आणि खूप काही...

विराट कोहलीचा खराब फॉर्म चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे. या स्टार फलंदाजाने नोव्हेंबर 2019 मध्ये शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहे. तेव्हापासून तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये धावा काढण्यासाठी धडपडत आहे. मोठी गोष्ट म्हणजे खराब फॉर्ममुळे विराट कोहलीच्या भारतीय टी-20 संघातील स्थानावरही प्रश्न उपस्थित झाले होते. कोहलीच्या संघातील स्थानावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीचे समर्थन केले असून तो पाकिस्तानविरुद्ध फॉर्ममध्ये परतणार असल्याचे सांगितले आहे.

ravi shastri on virat kohli
Asia Cup 2022 : उपकर्णधार केएल राहुलवर आशिया कप 2022 पूर्वी टांगती तलवार

आशिया चषकापूर्वी स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रवी शास्त्री म्हणाले, कोहलीला फॉर्ममध्ये परतण्यासाठी एका डावाची गरज आहे कारण त्याची धावांची भूक संपलेली नाही. भूतकाळात जे घडले ते इतिहास आहे. लोकांना लक्षात ठेवा. त्यांची आठवण खूप कमी आहे. विराट कोहलीपेक्षा फिट असा कोणताही भारतीय क्रिकेटर नाही. जर त्याने आपले मन योग्य ठिकाणी ठेवले तर फॉर्ममध्ये येण्यासाठी फक्त एक डाव पुरेसा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com