ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकायचं असेल तर... 3 भाषेत शिव्या देता आल्या पाहिजेत - रवि शास्त्री | Ravi Shastri News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi Shastri reveals how India copes with the sledging of the Australia tour

ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकायचं असेल तर... 3 भाषेत शिव्या देता आल्या पाहिजेत - रवि शास्त्री

टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना शाब्दिक मारामारी आणि स्लेजिंगला प्रत्युत्तर म्हणून रवी शास्त्रीने भारतीय खेळाडूंना एक सल्ला दिला होता. हे उघड केले आहे. टीम इंडियाने 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्यात रवी शास्त्री यांच्या मोलाचा वाटा होता.

आधी आपल्या टीमचे खेळाडू उलट उत्तर न देता शांत बसायचे. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, कोणी तुम्हाला धमकावत असेल तर त्याच भाषेत उत्तर द्यायचं, भले तुम्ही घरच्या मैदानात खेळत असाल किंवा परदेशी भूमीवर. ऑस्ट्रेलियन टीमच्या शिव्यांना प्रत्युत्तर द्या असं टीमला रवी शास्त्रींनी सांगितलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळाडूंमधील सुरुवातील टोन सेट करून ठेवणे. तुमचा काय विश्वास आहे, तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते, स्पर्धा आणि जिंकण्यासाठी तुम्ही मानसिकता बदलता आली पाहिजे.

ऑस्ट्रेलिया बरोबर खेळत असताना, मी टीमला सांगितले होते. जर तुम्हाला कोणी F*** म्हटले तर त्यांना तीन शिव्या परत द्या, दोन आपल्या भाषेत आणि त्यांच्या भाषेत एक.' रवी शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षकपदी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने केवळ ऑस्ट्रेलियातच नाही तर इंग्लंडमध्येही चांगली कामगिरी केली आहे.

Web Title: Ravi Shastri Reveals How India Copes With The Sledging Of The Australia Tour

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top