अश्विनने टाकला 131.6 km/h वेगाने चेंडू; काय आहे गौडबंगाल?

आयपीएल १५ व्या सीझनमध्ये आर अश्विनने आपल्या कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Ravichandran Ashwin
Ravichandran Ashwinesakal

आयपीएल १५ व्या सीझनमध्ये आर अश्विनने आपल्या कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याच्या वेगाने त्याने क्रिकेट पंडीत आणि चाहत्यांचे मनं जिंकलं आहे. त्याने या सीझनमध्ये १८५ धावा आणि ११ विकेट घेतल्या आहेत. अशातच माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफने स्पिनर १५० KMPH वेगाने चेंडू फेकण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, गुजरातविरुद्ध खेळताना त्याने त्याचा हा सल्ला ऐकला असल्याचा प्रत्यय आला. पण...

Ravichandran Ashwin
...तेव्हा माझ्या क्रिकेटला ब्रेक लागेल, आर अश्विनचा खुलासा

गुजरातविरुद्ध खेळताना राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, क्रिकेट जगतात अश्विनच्या वेगाची चर्चा रंगली आहे. मॅचदरम्यान अश्विनने एक चेंडू टाकला ज्याचा वेग 131.6 किमी ताशी होता. हे पाहून सर्वजण चकित झाले.

गुजरातच्या डावाच्या 8व्या षटकात मॅथ्यू वेडविरुद्ध गोलंदाजी करताना अश्विनच्या एका चेंडूचा वेग 131.6 किमी/ताशी मोजला गेला. स्पीडगनने स्पीड मोजल्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Ravichandran Ashwin
20 वर्षीय खेळाडू अश्विनवर चिडाला; सोशल मीडियावर चाहते म्हणाले...

ब्रॉडकास्टरच्या चुकीमुळे

अश्विनच्या नावासमोर ताशी 131.6 किमीचा वेग पाहून चाहत्यांना धक्काच बसला. सामन्यादरम्यान, मॅच ब्रॉडकास्टरच्या चुकीमुळे, अश्विनच्या नावासमोर चेंडूचा वेग 131.6 किमी / ताशी रीडिंग लिहिला गेला.

सोशल मीडियावर मॅच ब्रॉडकास्टरच्या या चुकीबद्दल चाहते सतत ट्विट करत आहेत आणि आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. मॅच ब्रॉडकास्टरने कैफच्या सल्ल्यानुसार अशी चूक केल्याचे अनेकांनी गंमतीने म्हटले आहे. तर शोएब अख्तरचे रेकॉर्ड तोडले. अशा मजेशीर कमेंट्स करण्यात येत आहेत.

अश्विनने क्वालिफायर-1 सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध 4 षटके टाकली आणि 40 धावा दिल्या. मात्र, तो एकही विकेट घेऊ शकला नाही.

कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आयपीएल २०२२ चा पहिल्या क्वालिफायर सामना खेळला गेला. डेव्हिड मिलरच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सात विकेटने पराभव केला. पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धा खेळणारा गुजरात संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com