IND vs ENG
IND vs ENGesakal

IND vs ENG : अश्विन - भरतने दिली झुंज मात्र टॉम हार्टलीने भारताला ढकलले पराभवाच्या खाईत

Ravichandran Ashwin KS Bharat Fight Back IND vs ENG : पोप नंतर टॉम हार्टली चमकला, पदार्पणातच सहा विकेट्स

Ravichandran Ashwin KS Bharat Fight Back : इंग्लंडने पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी विजयासाठी 231 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडने हैदराबाद कसोटी 28 धावांनी जिंकत 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. इंग्लंडकडून चौथा दिवस ओली पोपने 196 धावा करत आणि टॉम हार्टलीने 7 विकेट्स घेत गाजवला. हार्टलीने 34 धावांचे योगदान देत मोलाचा वाटा उचलला.

इंग्लंडने 231 धावांचे आव्हान पार करताना भारताची चांगल्या सुरूवातीनंतर अवस्था सात बाद 119 धावा अशी झाली होती. मात्र रविचंद्रन अश्विन आणि केएस भरतने आठव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी रचत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र दिवसाचा खेळ संपण्यात काही षटके शिल्लक असतानाच हार्टलीने भरत आणि अश्विनला प्रत्येकी 28 धावांवर बाद केलं.

भारताने दुसऱ्या डावात देखील इंग्लंडची अवस्था 5 बाद 163 धावा अशी केली होती. मात्र ओली पोपने तळातील फलंदाजांना साथीला घेत इंग्लंडला तब्बल 420 धावा उभ्या करून दिल्या. यात पोपचा वाटा हा 196 धावांचा होता. जरी त्याचे द्विशतक हुकले तरी त्याने इंग्लंडच्या बॅझबॉल भारतात देखील यशस्वी करून दाखवला.

दुसऱ्या डावात 231 धावांचे आव्हान मिळालेल्या भारतीय संघाने चौथ्या दिवशीच्या खेळपट्टीवर आक्रमक सुरूवात केली. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी नवीन चेंडूवर धावा करण्यास सुरूवात केली होती.

मात्र 42 धावांवर भारताला पाठोपाठ दोन धक्के बसले. सलामीवीर यशस्वी जयस्वालला टॉम हार्टलीने 15 धावांवर बाद केले. त्यानंतर त्याच षटकात हार्टलीने शुभमन गिलला बाद केलं. रोहित शर्मा 39 धावा करून नाबाद होता. त्याने केएल राहुल सोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला.

मात्र हार्टली पुन्हा एकदा भारताला मोठा धक्का दिला. त्याने रोहित शर्माला 39 धावांवर बाद केलं. यानंतर केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्यावर भारताचा डाव पुढे नेण्याची जबाबदारी होती. मात्र अक्षर पटेल टी टाईमनंतर 17 धावा करून बाद झाला. केएलच्या साथीला अय्यर आला होता.

मात्र रूटने पुन्हा एकदा जोडी फोडली. त्याने राहुलला 22 धावांवर पायचीत बाद केलं. राहुल बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजा आणि अय्यर ही जोडी मैदानावर होती. मात्र जडेजा 2 धावांवर धावबाद झाला. अन् त्यानंतर जॅक लिचने अय्यरचा देखील अडसर दूर केला.

तत्पूर्वी, इंग्लंडने पहिल्या डावात 246 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 436 धावा करत 190 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात इंग्लंडकडून स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात 436 धावा केल्या. भारताकडून रविंद्र जडेजाने 87, केएल राहुलने 86 आणि यशस्वी जयस्वालने 80 धावांचे योगदान दिले.

भारताने पहिल्या डावात 190 धावांची आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात 420 धावा ठोकल्या. ओली पोपने दोन जीवनदानांचा फायदा उचलत 278 चेंडूत 196 धावा ठोकल्या. त्याने बेन फोक्ससोबत 112, रेहान अहमदसोबत 64 तर टॉम हार्टली सोबत 80 धावांची भागीदारी रचली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com