धोनीच्या 'त्या' सल्ल्याने मानसिक धक्क्यातून सावरलो : अश्विन | Ravichandran Ashwin | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravichandran Ashwin
धोनीच्या 'त्या' सल्ल्याने मानसिक धक्क्यातून सावरलो : अश्विन

धोनीच्या 'त्या' सल्ल्याने मानसिक धक्क्यातून सावरलो : अश्विन

भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या एका वक्तव्यामुळे आपणास मानसिक धक्का बसला होता याचा खुलासा केला होता. आता अश्विनने मानसिक धक्क्यातून (Mental Trauma) सावरण्यासाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) सल्ला कसा कामी आला होता हे सांगितले. अश्विनने 2021 मध्ये 8 कसोटी सामन्यात 52 विकेट घेतल्या आहेत. तो 2021मध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. पण, काही वर्षापूर्वी त्याला एकदिवसीय आणि टी 20 संघातील आपले स्थान गमवावे लागले होते. दरम्यानच्या काळात सो मानसिक तणावातून जात होता. (Ravichandran Ashwin Interview)

अश्विने 2017 मध्ये एकदिवसीय आणि टी 20 संघातील आपले स्थान गमावले होते. त्यातच 2018 - 19 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) विदेशातील आमचा सर्वात चांगला फिरकीपटू संबोधले होते. त्यानंतर अश्विन दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीला मुकला होता.

या कठीण काळाबद्दल बोलताना अश्विनने सांगितले की ज्यावेळी तो या मानसिक तणावातून (Mental Trauma) जात होता त्यावेळी महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) एक सल्ला यातून बाहेर पडण्यासाठी कामी आला. अश्विन म्हणाला, 'मला वाटते मला माझ्याबद्दल चांगले माहित आहे. मी खूप विचार करतो. दुखापतीतून सावरुन पुनरागमन करणे किती कठिण असते. कारण ती गोष्ट तुमच्या बॅक ऑफ माईंडमध्ये राहते.'

अश्विन (R Ashwin Interview) पुढे म्हणाला 'तुम्हाला दुखापत झाली आणि तुम्ही माझ्यासारखेच मानसिक ताणावातून जात असाल तर दुखापतीतून सावरणे कठिण असते. मला याचा चांगलाच अनुभव आला आहे. मी आयुष्यातील विरोधात जाणाऱ्या गोष्टींचा चांगल्या प्रकारे सामना करु शकतो. मी आयुष्यात अपयशांना कधी घाबरलो नाही. तुम्ही मैदानावर अपयशी ठरला तरी ठीक आहे. एम.एस. धोनी कायम म्हणतो की ही एक प्रक्रिया विरुद्ध निकाल अशी लढत असते. मला असे वाटते की मी प्रक्रिया चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. मला लोखो करोडो लोकांच्या समोर अपयशी होण्याची भीती वाटत नाही. निदान मला इथे येऊन कामगिरी करण्याची आणि यशस्वी होण्याची संधी तरी मिळाली. अनेक लोकांना ही संधी देखील मिळत नाही.'

अश्विन (Ravichandran Ashwin)सध्या तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरला सुरु होणार आहे. दुखापतीमुळे रविंद्र जडेजा दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकला आहे. त्यामुळे भारतीय फिरकी विभागाची सर्व जबाबदारी आर. अश्विनवर असणार आहे.

Web Title: Ravichandran Ashwin Told How Ms Dhoni Advice Help To Overcome Interview

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..