Ravindra Jadeja : IPL 2022 पासूनच जडेजा - सीएसके 'संपर्क' क्षेत्राबाहेर

Ravindra Jadeja Chennai Super Kings Not In Touch With Each Other Since IPL 2022
Ravindra Jadeja Chennai Super Kings Not In Touch With Each Other Since IPL 2022esakal

Ravindra Jadeja : चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजासाठी यंदाचा आयपीएल हंगाम फारसचा चांगला गेला नव्हाता. हंगाम सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी त्याच्या गळ्यात चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) कर्णधारपदाची माळ गळ्यात पडली होती. मात्र हंगाम अर्ध्यावर आला त्यावेळी त्याला ही कर्णधार पदाची माळ गळ्यातून उतरवत एमएस. धोनीच्या (MS Dhoni) गळ्यात घालावी लागली होती. हा रविंद्र जडेजाचा अपमान असल्याची चर्चा सुरू झाली. तो देखील दुखापतीचे कारण देत उरलेला हंगाम खेळला नाही. त्यानंतर रविंद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्जबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले.

Ravindra Jadeja Chennai Super Kings Not In Touch With Each Other Since IPL 2022
गांधीजींची हत्या, तिरंग्याचा अपमान अन् दोन क्रिकेटर गेले पाकिस्तानात; काय आहे प्रकरण?

जेव्हा रविंद्र जडेजाने मुंबईतील सीएसकेचा संघ थांबलेले हॉटेल सोडले तेव्हापासून रविंद्र जडेजा आणि फ्रेंचायजीमधील मतभेद काही दूर झालेले नाहीत. त्यानंतर रविंद्र जडेजाने सोशल मीडियावरील सीएसके संदर्भातील सर्व पोस्ट डिलीट केल्या. त्यानंतर त्याने महेंद्रसिह धोनीला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. दरम्यान, धोनीने पुढचा आयपीएल हंगाम खेळण्याचा आणि संघाचे नेतृत्व देखील करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. त्यामुळे जडेजा पुन्हा सीएसकेमध्ये परतण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. आता जडेजाला इतर मोठ्या फ्रेंचायजींकडून विचारणा देखील होत आहे.

सध्याच्या घडीला सीएसकेचे व्यवस्थापन, धोनीने जडेजाला शांत करत संघात कायम ठवण्यासाठी शेवटचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. जडेजा सीएसकेशी 2012 पासून जोडला गेला आहे. या फ्रेंचायजीतच त्याने आपल्या अष्टपैलूत्वाला पैलू पाडले आहेत. त्याच्या सध्याच्या कामगिरीत सीएसकेचा देखील मोठा वाटा आहे. धोनीने जडेजाला त्याच्या चांगल्या वाईट काळात कायम साथ दिली आहे. याच भावनिक मुद्द्याचा विचार करून हे प्रकरण नव्याने हाताळणे गरजेचे आहे.

Ravindra Jadeja Chennai Super Kings Not In Touch With Each Other Since IPL 2022
Independence day 2022 : 'हा तर आपला उत्सव' म्हणत कैफने फडकवला तिरंगा

सध्या अनेक येत्या काळात कर्णधार हवा असणारे संघ जडेजाच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांच्यात अधिकृतरित्या कोणचेही बोलणे सुरू झालेले नाही. सीएसके मॅनेजमेंट धोनीला पटवून देत आहेत की जर जडेजाने आयपीएलमध्ये कामगिरी केली नाही तर त्याचे टीम इंडियाच्या टी 20 संघातील स्थान धोक्यात येऊ शकते. यामुळेच त्यांनी त्याला कर्णधारपदाच्या भारातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com