सर जडेजा 'सुपरमॅन', क्षेत्ररक्षणाचे चाहत्यांनी केले कौतुक

रवींद्र जडेजाच्या 2 झेलांनी सामन्याची दिशाच बदलून टाकली त्यामुळे....
ravindra jadeja
ravindra jadeja

ENG vs IND: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असतो. गोलंदाजी आणि फलंदाजी व्यतिरिक्त तो सध्या जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात त्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर मालिकेतील निर्णायक सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 45.5 षटकांत सर्वबाद 259 धावांवर आटोपला. या मालिकेत भारताने इंग्लंडला तिसऱ्यांदा ऑलआउट केले आहे. इंग्लंडला या धावसंख्येपर्यंत रोखण्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र यादरम्यान रवींद्र जडेजाच्या 2 झेलांनी सामन्याची दिशाच बदलून टाकली त्यामुळे त्याच्या क्षेत्ररक्षणाचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.

मोहम्मद सिराज आणि हार्दिक पांड्या यांच्या धारदार गोलंदाजीमुळे इंग्लिश संघाने 74 धावांवर 4 विकेट गमावल्या. त्यानंतर मोईन अलीने जोस बटलरसोबत 149 धावांची भागीदारी केली. मोईन अलीची विकेट पडताच क्रीजवर आलेल्या लियाम लिव्हिंगस्टोननेही (२७) हात उघडले आणि धडाकेबाज शैलीत फलंदाजीला सुरुवात केली. मात्र 37व्या षटकात हार्दिकने या दोन्ही फलंदाजांना बाद केले. ज्यात त्याने रवींद्र जडेजाने 2 अप्रतिम झेल टिपले.

रवींद्र जडेजाने 37व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगवर सीमारेषेच्या अगदी जवळ जाऊन लियाम लिव्हिंगस्टोनला झेलबाद केले. यानंतर त्याने शेवटच्या चेंडूवर त्याच दिशेने जोस बटलरचा (60) धावणारा झेल टिपला. हे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर इंग्लंडला केवळ 259 धावा करता आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com