INDvsWI : रोहित-अश्विनला वगळण्याचे हे आहे खरे कारण

वृत्तसंस्था
Friday, 23 August 2019

आश्विन किंवा रोहितसारख्या खेळाडूंना संघात संधी न मिळणं ही सर्वात कठीण गोष्ट असते, मात्र संघ व्यवस्थापन नेहमी सर्वोत्तम समतोल असलेला संघ निवडण्यासाठी प्रयत्नशील असते.

अॅंटिग्वा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर म्हणून रोहित शर्माला स्थान द्यावे अशी माजी कर्णधार सौरभ गांगुलीसह अनेक चाहत्यांची इच्छा होती. मात्र, तसे झाले नाही. त्याचबरोबर भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यालाही संघात स्थान देण्यात आले नाही. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने आता यामागचे खरे कारण स्पष्ट केले आहे. 

''आश्विन किंवा रोहितसारख्या खेळाडूंना संघात संधी न मिळणं ही सर्वात कठीण गोष्ट असते, मात्र संघ व्यवस्थापन नेहमी सर्वोत्तम समतोल असलेला संघ निवडण्यासाठी प्रयत्नशील असते.  अँटीग्वाच्या खेळपट्टीवर व्यवस्थापनाला सहाव्या क्रमांकावर अशा फलंदाजाची गरज होती जो गोलंदाजीही करु शकतो. याचसाठी जडेजाला संघात स्थान देण्यात आले.हा निर्णय घेताना कर्णधार आणि प्रशिक्षकांमध्ये याबद्दलची चर्चा झाली होती,'' सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजिंक्य रहाणेने सांगितले. 

सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रहाणेने आधी लोकेश राहुल आणि त्यानंतर हनुमा विहारीसोबत भागीदारी रचत जाव सावरला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The reason behind dropping Rohit Sharma and R Ashwin in 1st test