मुंबई, 7 फेब्रुवारी 2025: मुंबई लीगमध्ये अंतिम फेरीत रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्प्स(आरएफवायसी) संघाने ब्रदर्स स्पोर्ट्स असोसिएशन संघाचा 6-1 असा पराभव करून ड्रीम स्पोर्टस अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद संपादन केले. .कुपरेज फुटबॉल स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुंबई लीग मधील विजेता संघ 17 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला आहे. बेंगळुरू विभागातून चेन्नईन एफसी, दिल्ली विभागातून विजेता संघ पंजाब एफसी हे पात्र ठरले आहेत..सामन्यात 16व्या मिनिटाला आरएफवायसीच्या अतुल बी याने गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर 24व्या मिनिटाला मध्यरक्षक फारीस ए याने गोल करून संघाची आघाडी 2-0 ने वाढवली. पूर्वार्धात ही आघाडी कायम होती..उत्तरार्धात 49व्या मिनिटाला ब्रदर्स स्पोर्ट्स असोसिएशन च्या आर्यन तमंगने गोल करून ही आघाडी कमी केली. पण आरएफवायसीने जोरदार प्रतिक्रमण केले. फारिस याने 68व्या मिनिटाला आणखी एक गोल केला, तर त्यानंतर शॉन फर्नांडिस याने 72 व 84व्या मिनिटाला दोन गोल करून संघाला 5-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. 87व्या मिनिटाला आयुष सिहग याने गोल करून आरएफवायसी संघाला 6-1 असा विजय मिळवून दिला..आरएफवायसीचे प्रशिक्षक जयराज जी म्हणाले की, गट साखळी आम्ही चांगली कामगिरी केली. अंतिम सामन्यात देखील आम्ही उत्तम खेळ केला. ड्रीम स्पोर्टस अजिंक्यपद स्पर्धा ही उत्तमरीत्या आयोजित केली आहे. त्यांच्या या व्यवस्थापनबद्दल आम्ही आनंदी आहे. ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनने आयोजित केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.