ॲथलीटस्‌च्या शूजवर निर्बंध लागणार

किपचोगच्या नाईकी बुटावरून वाद; पॅरिस ऑलिंपिकनंतर बदल होणार
Eliud Kipchoge
Eliud Kipchogesakal

मुंबई : केनियाचा महान धावपटू एल्यूड किपचोग (eliud kipchoge)याने २०१९ मध्ये ऑस्ट्रीयामधील व्हीएनामध्ये झालेल्या विशेष इव्हेंटमध्ये १.५९.४० अशी वेळ देत पूर्ण मॅरेथॉन शर्यत पूर्ण केली. पण या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी लागणारे नियम लागू करण्यात आले नव्हते, त्यामुळे या विक्रमाची नोंद करण्यात आली नाही. पण केनियाच्या या धावपटूने दोन तासांपेक्षा कमी वेळेत ही शर्यत पूर्ण केल्यानंतर त्याने परिधान केलेल्या शूजवरून वाद निर्माण झाला. शूजमधील कार्बन फायबर प्लेटसने त्याला वेगवान धावायला मदत मिळाली, असा आरोप होऊ लागला. आता या प्रकरणाची जागतिक ॲथलेटीक्सकडून गंभीर दखल घेण्यात आली असून २०२४ मधील पॅरिस ऑलिंपिंकनंतर प्रत्येक ॲथलीटसला नियमात बसणारे शूज घालावे लागणार आहेत. (Athletes will have to wear shoes that fit the rules)

Eliud Kipchoge
आज भारत - पाकिस्तान भिडणार, वाचा कुठे बघायचा लाईव्ह सामना

एल्यूड किपचोग याने ऑस्ट्रीया येथील शर्यत नाईकी वेपरफ्लाय नेक्स्ट हे शूज घालून पूर्ण केली होती. यानंतर ऑलिंपियन धावपटू रायन हॉल याने यावर आक्षेप घेतला होता. एल्यूड किपचोग याने आपल्या शूजला जे सोल बसवले आहेत त्यामुळे त्याची धावण्याची गती वाढत आहे. स्प्रींग मशीनप्रमाणे त्याला बळ मिळत आहे. इतर धावपटूंसाठी हा अन्याय आहे, असा आरोप रायन हॉल याच्याकडून करण्यात आला होता. यानंतर आता जागतिक ॲथलेटीक्सकडून नव्या नियमाचा अवलंब करण्यात येत आहे. (New rules are being adopted by world athletics)

करण्यात आलेले महत्त्वाचे बदल

  • १ नोव्हेंबर, २०२४ पासून जगभरातील ॲथलीटसना २० मिलीमीटरचा सोल असलेले शूज घालावे लागणार आहेत.

  • प्रत्येक शर्यत संपल्यानंतर ॲथलीटसचे शूज चेक करण्यात येणार आहेत.

Eliud Kipchoge
Asia Cup, IND vs PAK: पाकनं उडवला धूल सेनेचा धुरळा!

कार्बन प्लेटमुळे धावपटूंना मदत होते : विजेंदर सिंग

साईचे वरिष्ठ प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्याशी सकाळने संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, केनियाच्या धावपटूने कार्बन प्लेट सोल असलेले शूज घातल्यानंतर जबरदस्त कामगिरी केली. कार्बनच्या प्लेटमध्ये धावपटूंना धावण्यास मदत होते. खेळाडूंना पुश व बॅक करता येते. धावण्याला गती मिळते, असे त्यांनी सांगितले.भारतीय धावपटू अद्यापही कार्बन प्लेट सोल असलेले शूज वापरत नाहीत. कारण हे शूज किमान २० ते ३० हजार इतक्या रकमेचे असतात. ते भारतीय धावपटूंना परवडत नाहीत. त्यामुळे भारतीय धावपटूंमुळे वाद होण्याचा प्रश्‍नच उद्‍भवत नाही.

- विजेंदर सिंग, वरिष्ठ प्रशिक्षक, साई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com