Ricky Ponting होणार नव्या संघाचा कोच; दिल्ली कॅपिटल्सच काय होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ricky ponting
Ricky Ponting होणार नव्या संघाचा कोच; दिल्ली कॅपिटल्सच काय होणार?

Ricky Ponting होणार नव्या संघाचा कोच; दिल्ली कॅपिटल्सच काय होणार?

दिल्ली कॅपिटल्स संघाचे हेड कोच रिकी पॉन्टींग (Ricky Ponting) आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. तो बिग बैश लीग (BBL) सीजन 12 पूर्वी 'हेड ऑफ स्ट्रॅटेजी' म्हणून होबार्ट हरिकेन्समध्ये सामील झाला आहे. हरिकेन्सने पॉन्टींगसोबत ३ वर्षाचा करार केला आहे. त्यामुळे आता पॉन्टिंग दिल्ली कॅपिटल्सच्या हेड कोचचा राजीनामा देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा: Ind Vs Sa: डिअर BCCI...संजू सॅमसनसाठी फॅन्सने केली ही मागणी

पॉन्टींग आणि हरिकेन्स यांच्याती करार अनेक अटींवर करण्यात आला आहे. हा करार करताना पॉन्टींग यांनी तीन अटी ठेवल्या आहेत. एक या संघाला पार्ट टाईम सेवा देणार आहेत. दुसरी ऑस्ट्रेलिया समर सीजन दरम्यान चॅनलवर समलोचकची भूमिका पार पाडणारत तसेच दिल्ली कॅपिटल्सच्या हेड कोच पदावर कायम राहणार अशी तिसरी अट त्यांनी ठेवली आहे.

हेही वाचा: Ind Vs Sa: दिल्ली T-20 सामन्यासाठी BCCI ने बदलले नियम

त्यामुळे पॉन्टींग नव्या संघाशी जोडला असला तरी दिल्ली कॅपिटल्ससोबत कायम राहणार आहे. ४७ वर्षीय पॉन्टींग यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघासोबत अंतरिम आणि विशेषज्ञ प्रशिक्षकाची भूमिका निभावली आहे.

Web Title: Ricky Ponting Back In Bbl Joins Hobart Hurricanes As Head Of Strategy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top