Ricky Ponting : इंग्लंड चाहत्याने पॉटिंगवर फेकली द्राक्षं; रिकीचाही जोरदार पलटवार Video होतोय व्हायरल

Ricky Ponting Ashes Series Controversy
Ricky Ponting Ashes Series Controversyesakal

Ricky Ponting Ashes Series Controversy : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हा ओव्हलवर खेळला जात आहेत. या सामन्याचे दोन दिवस झाले आहेत. मालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया 2 - 1 ने आघाडीवर आहे. मालिकेतील शेवटचा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया जवळपास 22 वर्षांनी इंग्लंडमध्ये अॅशेस जिंकण्याचा पराक्रम करण्यासाठी जोर लावत आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग या मालिकेत समालोचकाच्या भुमिकेत आहे. पाचव्या कसोटीत समालोचन करत असताना रिकी पॉटिंगला एका अनपेक्षित घटनेला सामोरे जावे लागले. इंग्लंडच्या बार्मी आर्मीने पॉटिंगवर द्राक्षे फेकून मारली. यामुळे पॉटिंग जाम भडकला.

Ricky Ponting Ashes Series Controversy
Marnus Labuschagne : 0.10 ची सरासरी! मार्नसने केली बॅझबॉलची क्रूर चेष्टा; किटबॅग भरून कॉफी बाळगणाऱ्याची सुस्त खेळी चर्चेत

ओवल कसोटीच्या पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पॉटिंग मैदानावरून लाईव्ह कॉमेंट्री करत होता. याचवेळी स्टँडमधील काही प्रेक्षकांनी त्यांच्यावर द्राक्षे फेकली. पॉटिंगला प्रेक्षकांची हे वागणं आवडलं नाही. तो जाम भडकला होता. कार्यक्रमाच्या होस्टने पॉटिंगला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र पॉटिंग काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार लाईव्ह कॉमेंट्रीमध्ये म्हणाला की, 'माझ्या अंगावर काही लोकांनी द्राक्षे फेकली आहेत. मला हे लोक कोण आहेत हे शोधण्यात काही अडचण येणार नाही.'

Ricky Ponting Ashes Series Controversy
WI vs IND 2nd ODI Playing 11 : रोहित नाही तर विराट संजूसाठी प्लेईंग 11 मध्ये निर्माण करणार जागा; उनाडकटही खेळणार?

चाहत्यांमध्ये सुरू झालंय युद्ध

इंग्लंडच्या चाहत्यांची ही कृती ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांना आवडली नाही. दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर जोरदार युद्ध सुरू झालं आहे. ते एकमेकांना ट्रोल करत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी इंग्लंडच्या बार्मी आर्मीला खेळ भावनेची आठवण करून दिली. ते म्हणाले की ट्रॉफी गमावल्यानंतर निदान खेळ भावना तरी दिसली पाहिजे.

ऑस्ट्रेलियाचे पारडे जड

पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पहिला डाव 283 धावात गुंडाळला. मिचेल स्टार्कने 4 विकेट्स घेतल्या. यानंतर पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 1 बाद 63 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सलामीवीर उस्मान ख्वाजाने 47 धावा करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 131 अशी केली.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com