रिंकू सिंहने टीम इंडियातील स्टार खेळाडूची कारकीर्द आणली धोक्यात; एकाच खेळीनं वातावरण टाईट

Ranji Trophy Rinku Singh Marathi News
Ranji Trophy Rinku Singh Marathi Newssakal

Ranji Trophy Rinku Singh : अलीकडेच भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय नोंदवला. पण या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप दिसली. दुसरीकडे कसोटी सामना संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रणजी ट्रॉफीला सुरुवात झाली. आणि पहिल्याच दिवशी रिंकू सिंगने आपल्या संघासाठी शानदार खेळी केली. या धुंवाधार फलंदाजीनंतर रिंकू सिंग निवडकर्त्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे.

Ranji Trophy Rinku Singh Marathi News
WTC Points Table 2023-25 | सिंहासन हिसकावलं! ऑस्ट्रेलियाने दोन दिवसात भारताला दिले दोन तगडे धक्के

खरं तर, रिंकू सिंग आता कसोटी क्रिकेटमध्ये दिग्गज श्रेयस अय्यरची जागा घेऊ शकते. अय्यरची गेल्या पाच कसोटींमधील कामगिरी पाहिली तर त्याला काही विशेष असे करता आले नाही. अय्यरचा गेल्या 5 कसोटी सामन्यांमधील सर्वोच्च धावसंख्या 31 आहे.

जी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातच केली होती. याआधी तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 कसोटी सामने खेळला होता. तिथेही त्याची कामगिरी चांगली झाली नाही. सर्वोच्च धावसंख्या फक्त 26 होती.

Ranji Trophy Rinku Singh Marathi News
Ambati Rayudu : आली लहर केला कहर! रायुडूने आठवड्याभरात वायएसआर सोडली, म्हणाला...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतही अय्यर फ्लॉप ठरला. पहिल्या कसोटीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात अय्यरने अनुक्रमे 31 आणि 6 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 0 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 4. सतत फ्लॉप ठरणाऱ्या अय्यरला आता टेस्ट टीममधून वगळावं लागू शकतं.

आगामी काळात अय्यरच्या जागी रिंकू सिंगची वर्णी लागण्याची शक्यता आहे. रिंकू मात्र कसोटीत सहाव्या क्रमांकावर आणि अय्यर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. पण टी-20 प्रमाणे रिंकूला पाचव्या क्रमांकावर खेळता येईल.

रणजी ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी केरळविरुद्ध रिंकू सिंगने शानदार खेळी केली. 103 चेंडूंचा सामना करताना रिंकूने 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 71 धावांची खेळी केली. अशा प्रकारे त्यांच्या संघाची एकूण धावसंख्या 244 धावांवर पोहोचली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com