नाव वल्हवत पाच सुवर्णांना गवसणी

किशोर पेटकर
बुधवार, 22 जून 2016

रोइंग म्हणजेच नाव वल्हवण्याचा खेळ. रुमानियाची एलिझाबेता लिपा-ओलेनियूक ही या खेळातील नावाजलेली खेळाडू. ऑलिंपिकमधील तिचे "रोइंग‘ थक्क करणारे आणि स्फूर्तिदायक आहे. वयाच्या 19व्या वर्षी सुवर्णपदकासह ऑलिंपिकच्या पाण्यातील यशस्वी प्रवास सुरू केलेल्या एलिझाबेता हिने वयाच्या 39व्या वर्षी शेवटच्या स्पर्धेतही सोनेरी पदकाची कमाई केली. ऑलिंपिकमधील तिची कारकीर्द 20 वर्षांची. सहा ऑलिंपिक स्पर्धांत तिने पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि एका ब्रॉंझसह एकूण आठ पदकांची लयलूट केली. 1988 मधील सोल येथील स्पर्धा वगळता एलिझाबेताने प्रत्येक ऑलिंपिकमधून मायदेशी सुवर्णपदक नेले.

रोइंग म्हणजेच नाव वल्हवण्याचा खेळ. रुमानियाची एलिझाबेता लिपा-ओलेनियूक ही या खेळातील नावाजलेली खेळाडू. ऑलिंपिकमधील तिचे "रोइंग‘ थक्क करणारे आणि स्फूर्तिदायक आहे. वयाच्या 19व्या वर्षी सुवर्णपदकासह ऑलिंपिकच्या पाण्यातील यशस्वी प्रवास सुरू केलेल्या एलिझाबेता हिने वयाच्या 39व्या वर्षी शेवटच्या स्पर्धेतही सोनेरी पदकाची कमाई केली. ऑलिंपिकमधील तिची कारकीर्द 20 वर्षांची. सहा ऑलिंपिक स्पर्धांत तिने पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि एका ब्रॉंझसह एकूण आठ पदकांची लयलूट केली. 1988 मधील सोल येथील स्पर्धा वगळता एलिझाबेताने प्रत्येक ऑलिंपिकमधून मायदेशी सुवर्णपदक नेले. सहाही स्पर्धांत किमान एक पदक जिंकण्याची कामगिरीही तिने बजावली. ऑलिंपिक सहभागाचा "षटकार‘ नोंदविणारी ती पहिली महिला रोइंगपटू आहे. लॉस एंजलिसला तिने डबल स्कल्स प्रकारात विजेतेपद मिळवत ऑलिंपिक मोहिमेचा शुभारंभ केला. अथेन्स ऑलिंपिकमध्ये एट्‌स प्रकारात सुवर्णपदक मिळवून एलिझाबेताने सफल कारकिर्दीचा समारोप केला. निवृत्तीनंतर ती राजकारणातही कार्यरत राहिली. रोइंगमधील यशाचा आणि लोकप्रियतेचा लाभ तिला या क्षेत्रात झाला. सध्या ती रुमानियन सरकारमध्ये युवा आणि क्रीडा खात्याची मंत्री आहे.

एलिझाबेताची ऑलिंपिक कामगिरी संस्मरणीय आहे. ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना ती खूपच प्रेरित होत असे. पाच ऑलिंपिक सुवर्णपदकांच्या तुलनेत ती जागतिक स्पर्धेत फक्त एकदाच जिंकू शकली. लॉस एंजलिस ऑलिंपिकमध्ये डबल स्कल्सच्या अंतिम लढतीत एलिझाबेताने मारिओआरा पोपेस्कू हिच्या साथीत सुवर्णपदक जिंकले. चार वर्षांनंतर सोल येथे व्हेरोनिका कोगेनू ही तिची सहकारी होती. या जोडीने दोन पदके जिंकली; पण त्यात सोनेरी रंगाच्या पदकाचा समावेश नव्हता. हा अपवाद वगळता बार्सिलोना, अटलांटा, सिडनी आणि अथेन्स येथील स्पर्धेत तिने गळ्यात किमान एक सुवर्णपदक दिसेल, अशी कामगिरी नोंदविली. शेवटच्या तीन स्पर्धांत ती सांघिक एट्‌स प्रकारात सहभागी झाली. ऑलिंपिक रोइंगमध्ये पाच विजेतीपदे मिळविणारी ती एकमेव महिला आहे.
 

बार्सिलोना येथे सिंगल स्कल्स प्रकारात तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. या प्रकारातील तिचे हे पहिलेच पदक होते. याच स्पर्धेत व्हेरोनिकाच्या साथीत तिला डबल स्कल्समध्ये रौप्यपदक मिळाले. अटलांटा येथे पदक जिंकून तिने नवा विक्रम नोंदविला. एट्‌स प्रकारात तिचा संघ जिंकला, त्यामुळे ऑलिंपिक रोइंगमध्ये सहा पदके जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरली. अथेन्स येथे एट्‌स प्रकारात तिला सुवर्णपदक मिळाले. हे पदक जिंकणारी ती ऑलिंपिकमधील वयस्क महिला रोइंग खेळाडू ठरली.
 

एलिझाबेताची ऑलिंपिक पदके
- 1984, लॉस एंजलिस : सुवर्ण (डबल स्कल्स)
- 1988, सोल : रौप्य (डबल स्कल्स), ब्रॉंझ (क्वॉड्रपल स्कल्स)
- 1992, बार्सिलोना : सुवर्ण (सिंगल स्कल्स), रौप्य (डबल स्कल्स)
- 1996, अटलांटा : सुवर्ण (एट्‌स)
- 2000, सिडनी : सुवर्ण (एट्‌स)
- 2004, अथेन्स : सुवर्ण (एट्‌स)

Web Title: Rio Olympics Countdown