David Warner : दिल्लीला मिळणार आयपीएल जिंकून देणारं नेतृत्व; पंतच्या जागी सर्फराज करणार...

David Warner Delhi Capitals Captain
David Warner Delhi Capitals Captainesakal

David Warner Delhi Capitals Captain : ऋषभ पंत कार अपघातात जबर जखमी झाल्याने तो क्रिकेटच्या मैदानावर अजून काही महिने तरी परतू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार पंत आयपीएल 2023 मध्ये देखील तो सहभागी होऊ शकणार नाहीये. यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात पंतच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व कोण करणार अशी चर्चा सुरू झाली. यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघ व्यवस्थापनासमोर काही नावे आहेत.

David Warner Delhi Capitals Captain
Shakib Al Hasan BPL : फक्त एका महिन्यात सुतासारखं सरळ करतो! शाकिबचे व्यवस्थापनाला आव्हान

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार दिल्ली कॅपिटल्सने सनराईजर्स हैदराबादला आयपीएल जिंकून देणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला कर्णधार करण्याचा निर्णय केला आहे. वॉर्नरला आयपीएलमध्ये कॅप्टन्सी करण्याचा अनुभव आहे. मात्र हैदराबादने वॉर्नरसोबत वाद झाल्यानंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले होते. त्यानंतर वॉर्नरने संघ देखील सोडला होता.

ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा फक्त कर्णधार नव्हता तर तो विकेटकिपिंग देखील करायचा. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला त्याच्या अनुपस्थितीत नवा विकेटकिपर देखील शोधावा लागणार आहे. यासाठी रणजी ट्रॉफीत खोऱ्याने धावा करणाऱ्या सर्फराज खानला विकेटकिपिंगची जबाबदारी सोपवण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे. (Sports Latest News)

David Warner Delhi Capitals Captain
दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वीच रँकिंगमध्ये मोठी खळबळ; हुड्डाने घेतली 40 स्थानांची उसळी, किशनचीही चांदी

याचबरोबर ऋषभ पंत जर आयपीएल खेळू शकला नाही तर भारताली 19 वर्षाचा वर्ल्डकप जिंकून देणारा यश धूलला देखील आयपीएल पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने यश धूलला विकत घेतले होते. मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.

हेही वाचा : ...तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com