कपाळावर खोच, गुडघ्याची लिगामेंट, मनगटाला दुखापत अन्...; पंतच्या जखमांबाबत BCCIचा मोठा खुलासा : Rishabh Pant accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh Pant Car Accident

Rishabh Pant accident: कपाळावर खोच, गुडघ्याची लिगामेंट, मनगटाला दुखापत अन्...; पंतच्या जखमांबाबत BCCIचा मोठा खुलासा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या कारला दिल्लीनजीक भीषण अपघात झाला. यामध्ये त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहे. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या हवाल्यानं त्याला कुठे कुठे मार लागलाय याचा खुलासा BCCIनं केला आहे. त्याची मर्सिडिज कार पूर्णपणे जळू खाक झाली आहे. (Rishabh Pant accident Forehead injury knee ligament wrist injury and more injuries says)

बीसीसीआयनं म्हटलं की, ऋषभच्या कपाळावर दोन ठिकाणी खोच पडली आहे. त्याच्या उजव्या गुडघ्याची लिगामेंट तुटली आहे. त्याच्या उजव्या मनगटाला, घोटा, पायाच्या बोटांना दुखापत झाली आहे. त्याचबरोबर त्याच्या पाठीला मोठ्या प्रमाणावर खऱचटलं आहे. शरिरावर अनेक जखमा झालेल्या असल्या तरी ऋषभची प्रकृती स्थिर असून त्याला पुढील उपचारांसाठी डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलं आहे.

हे ही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

पुढील उपचारांसाठी त्याच्या शरिरावर आणखी किती जखमा झाल्या आहेत याची माहिती मिळावी यासाठी त्याच्या शरिराचे एमआरआय काढण्यात येत आहेत. बीसीसीआय सातत्यानं ऋषभच्या कुटुंबियांच्या संपर्कात असून सध्या ऋषभवर जे डॉक्टर उपचार करत आहेत त्यांच्याही आमची मेडिकल टीम संपर्कात आहे, अशी माहिती बीसीसीआयनं दिली आहे.