Get Well Soon Champ पंतच्या अपघातानंतर सोशल मीडियावर प्रार्थना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh pant

Get Well Soon Champ पंतच्या अपघातानंतर सोशल मीडियावर प्रार्थना

भारतीय टीमचा खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्याच्या अपघातानंतर सोशस मीडियालर प्रार्थना करण्यात येत आहे. Get Well Soon Champ असे मेसेज व्हायरल होत आहेत. (Rishabh pant car accident Get Well Soon Champ Social media)

हेही वाचा: Rishabh Pant Accident: ऋषभ पंत देणार होता आईला सरप्राईज, पण मध्येच...

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभच्या गुडघ्याला गंभीर जखम झाली आहे. देहरादून रुग्णलयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गरज पडल्यास एअरलिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्यांनुसार, त्यांना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांच्या कपाळावर, पाठीवर आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

हेही वाचा: व्हिडिओमध्ये पाहा पंतच्या गाडीचा अपघात किती भीषण होता... थोडक्यात बचावला, कार जळून खाक...

अपघातस्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये ऋषभ पंतची कार वेगात रेलिंगला धडकली आणि आग लागली. या धक्कादायक अपघाताच्या बातमीवर क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी आपल्या प्रतिक्रियेत भारतीय क्रिकेटपटूला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Rishabh Pant