esakal | धोनीला जमलं नाही ते पंतनं करुन दाखवलं
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh Pant

धोनीला जमलं नाही ते पंतनं करुन दाखवलं

sakal_logo
By
सुशांत जाधव

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत धमाकेदार कामगिरीचा रिषभ पंतला (Rishabh Pant) मोठा फायदा झालाय. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) त्याने सहाव्या स्थानावर झेप घेतली असून आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप टेनमध्ये स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय विकेट किपर (Indian Wicketkeeper) ठरलाय.भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार आणि विकेट किपर महेंद्र सिंह धोनीसह अन्य कोणत्याही भारतीय विकेट किपरला कसोटी क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान मिळालेले नाही. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी त्याने ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावे केलीये. महेंद्रसिंह धोनीशिवाय (MS Dhoni) द्रविडने विकेटमागे बराचकाळ भूमिका बजावली. पण त्यांना रिषभ पंतसारखा पराक्रम करता आलेला नाही.

हेही वाचा: ऑसी मालदीवला पोहचले, हसी-बालाजी एअर अ‍ॅम्बुलन्समधून चेन्नईला

आयसीसीच्या नव्या टेस्ट क्रमवारीत रिषभ पंत 747 गुणांसह सहाव्या स्थानावर आहेत. त्याच्याशिवा रोहित शर्मा आणि न्यूझीलंडचा हॅन्री निकोलसच्या खात्यातही 747 गुण जमा आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 814 गुणांसह 5 व्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन 919 अंकासह पहिल्या तर ऑस्ट्रेलियन स्टीव्ह स्मिथ 891 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन 878 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय कसोटी संघातील नियमित सदस्य असलेल्या पुजारा आणि रहाणे यांनी अनुक्रमे 14 आणि 15 व्या स्थानी आहेत.

हेही वाचा: IPL 2021: आता स्पर्धा UAE त होणार? गांगुली म्हणाले...

2019 मध्ये इंग्लंडमध्ये रंगलेल्या वर्ल्डकपमधील त्याची कामगिरी निराशजनक होती. यावेळी त्याच्यावर टीकाही झाली. त्याच्या शॉट सिलेक्शनवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत असताना तो आपला स्वाभाविक खेळ खेळत राहिला. 2019 च्या आयपीएलमध्येही त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आली नव्हती. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याची गाडी रुळावर आली. सिडनी कसोटीत अर्धशतकी खेळीनं त्याने भारतीय संघाचा पराभव टाळण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गाभाच्या मैदानात झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात पंतने मॅच इनिंग खेळी केली होती.

Rishabh Pant History As 1st Indian Wicketkeeper Top 10 Test rankings