esakal | रिषभ पंतने धोनीला केले 'ओव्हरटेक'
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh-Pant-MS-Dhoni

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पंतने कसोटी मालिकेत 21 झेल घेण्याच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली होती.

रिषभ पंतने धोनीला केले 'ओव्हरटेक'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जमैका : यष्टिरक्षक रिषभ पंत याने महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान 50 बळी पूर्ण करण्याची कामगिरी करण्याचा मान पंतने मिळविला.

कारकिर्दीमधील 11वा कसोटी सामना खेळताना पंतने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात विंडीजच्या दुसऱ्या डावात क्रेग ब्रेथवेटचा झेल घेताना ही कामगिरी केली. धोनीने ही कामगिरी 15 कसोटी सामन्यात केली होती.

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पंतने कसोटी मालिकेत 21 झेल घेण्याच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने 11 झेल घेतले होते. त्या मालिकेत यष्टिमागे 20 झेल घेणारा पंत पहिला भारतीय यष्टिरक्षक ठरला होता.

loading image
go to top