Rishabh Pant Accident : ...तर पायाचा काही भाग काढावा लागला असता; पंतने सांगितलं अपघातानंतर नेमकं काय झालं

Rishabh Pant Accident : ऋषभ पंतने अपघातानंतर काय काय घडलं हे सविस्तर सांगितलं.
Rishabh Pant Accident
Rishabh Pant Accidentesakal

Rishabh Pant Accident : भारताचा विकेटकिपर ऋषभ पंतच्या गाडीला डिसेंबर 2022 मध्ये भीषण अपघात झाला होता. पंत दिल्लीतून रूरकीला जात होता. त्यावेळी त्याची गाडी दुभाजकला धडकली होती. तो बांगलादेश दौऱ्यावरून परतला होता. त्याने मीरपूर कसोटीत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

दरम्यान, ऋषभ पंतने अपघातावेळीच्या आठवणींना उजाळा दिला. तो स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, 'जर माझ्या पायाची कोणतीही नस डॅमेज झाली असती तर माझ्या पायाचा काही भाग काढून टाकावा लागला असता. त्यावेळी मी खूप घाबरलो होतो.'

Rishabh Pant Accident
WTC Point Table IND vs ENG : एका पराभवानं संपूर्ण गणित बदललं; भारताची फायनलची वाट बिकट?

मी एसयूव्ही घेऊन गेलो होतो मात्र ही एसयूव्ही अपघातानंतर सिदान झाली होती. अपघातानंतर माझ्या उजव्या गुघ्यात वेदनेच्या प्रचंड कळा येत होत्या. तो डिसलोकेट झाला होता. जवळपास 180 डिग्री फिरला होता.

ऋषभ पंत म्हणाला की, 'माझ्याजवळ कोणीतरी येत असल्याचं मला जाणवलं. मी त्यांना माझा पाय सरळ करण्यासाठी त्यांची मदत घेतली. त्यांनी माझा गुडघा सरळ केला.' रजत कुमार आणि निशू कुमार यांनी पंतला एसयूव्हीमधून बाहेर काढलं होतं.

पंत त्या घटनेबद्दल बोलताना म्हणाला की, 'त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदाच मी अशा प्रकारच्या घटनेचा सामना करत होतो. मला माझ्या जखमांची जाणीव होती. मात्र मी स्वतःला नशीबवान समजतो कारण यापेक्षा भयंकर काहीतरी घडलं असतं.'

Rishabh Pant Accident
Budget 2024 R Praggnanandhaa : अर्थमंत्र्यांनी बजेट सादर करताना प्रज्ञानंदचा उल्लेख करत विरोधकांवर साधला निशाणा

पंतवर देहरादूनच्या रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला एअरलिफ्ट करून मुंबईला हलवण्यात आलं. पंतच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून त्याचे गुडघ्यातील तीनही लिगामेंट रिस्टोअर करण्यात आले. त्यानंतर पंत हळूहळू राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरत होता.

पंत याबाबत म्हणाला की, 'मी जगापासून सर्वतःला वेगळं करून दुखापतीतून सावरत होतो. त्यामुळे मला लवकर तंदूरूस्त होण्यास मदत झाली. अशा प्रकारच्या गंभीर दुखापतीत तुम्हाला रोज काही गोष्टी सातत्याने कराव्या लागतात. हे खूप कंटाळवाणं, निराशाजनक असतं. मात्र ते तुम्हाला करावच लागतं.' पंतने सांगितलं की डॉक्टरांच्या मते त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी 16 ते 18 महिने लागणार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com