Rishabh Pant: पंतच्या गुडघ्यावर तब्बल 4 तास चाललेली शस्त्रक्रिया अखेर संपली; मात्र आता... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh Pant

Rishabh Pant: पंतच्या गुडघ्यावर तब्बल 4 तास चाललेली शस्त्रक्रिया अखेर संपली; मात्र आता...

Rishabh Pant’s Knee Surgery Successful : टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतवर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी 6 जानेवारीला त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. खरं तर दिल्ली-डेहराडून हायवेवर ऋषभ पंतच्या कारच्या अपघातादरम्यान, दुभाजकावर आदळल्याने त्याच्या गुडघ्यातील लिगामेंटा फाटले होते. पुढील उपचारासाठी बुधवारी 4 जानेवारीला मुंबईत नेण्यापूर्वी पंतला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा: IND vs SL: पांड्या युझवेंद्र चहलला दाखवणार बाहेरचा रस्ता; 'या' अष्टपैलूला मिळणार संधी?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिगामेंट फाटल्यामुळे पंतवर शस्त्रक्रिया करण्यात आली, जी अखेर यशस्वी ठरली आणि तो बरा होत आहे. सूत्राने सांगितले की, “ऋषभ पंतच्या गुडघ्यावर काल शस्त्रक्रिया झाली. ही 3-4 तासांची प्रदीर्घ शस्त्रक्रिया होती. तो बरा होत आहे.

मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधील स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक्सचे संचालक डॉ. दिनशॉ पार्डीवाला यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाद्वारे ऋषभ पंतची देखरेख केली जात आहे. शस्त्रक्रियेनंतर पंतला आता लिगामेंट फाडण्याची पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे. पंतच्या दुखापती गंभीर होत्या आणि त्याच्या शरीराच्या अनेक भागांवर परिणाम झाला आणि त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी काही महिने लागतील.

हेही वाचा: मुलींनो गडबड करा! ही आहे Women's IPL Auction मध्ये नाव नोंदवण्याची शेवटची तारीख

बीसीसीआयने अपघाताच्या दिवशी 30 डिसेंबरला एका निवेदनात म्हटले होते की, पंत आणि त्याच्या कुटुंबीयांना या वेदनादायक काळातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जातील. दिल्लीहून घरी जात असताना पंत यांच्यासोबत हा अपघात झाला, पहाटे साडेपाच वाजता त्यांची कार महामार्गावरील दुभाजकाला धडकली आणि चुकीच्या दिशेने पडली.

कार पूर्णपणे जळून खाक झाली होती आणि त्याला काही स्थानिकांनी आणि हरियाणातील बस चालक आणि कंडक्टरने मदत केली. पंत लवकर बरा व्हावा यासाठी जगभरातील क्रिकेटपटू, चाहते आणि नागरिकांच्या आशा आणि प्रार्थना आहेत.