Rishabh Pant IPL 2023
Rishabh Pant IPL 2023sakal

Rishabh Pant : पंत IPL 2023 मधून बाहेर? हा खेळाडू दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाचा दावेदार

दिल्ली कॅपिटल्सला कर्णधारपद एका मजबूत खेळाडूकडे सोपवायचे आहे पण....

Rishabh Pant IPL 2023: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला अपघातानंतर डेहराडूनमध्ये उपचार सुरू आहेत. तो गंभीर जखमी झाला आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक पंतवर लक्ष ठेवून आहे. ऋषभ इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो आणि त्याने संघाचे नेतृत्वही करत आहे. मात्र अपघातामुळे तो पुढच्या मोसमात खेळू शकणार नाही. त्यामुळे दिल्ली आता नव्या कर्णधाराचा शोध करायचा आहे.

Rishabh Pant IPL 2023
Rishabh Pant Accident: पंतची प्लास्टिक सर्जरी, डोके अन् मणक्याचा MRI आला समोर... जाणून घ्या अपडेट

ऋषभ पंतच्या अपघातामुळे आयपीएल 2023 मध्ये खेळणे जवळपास अशक्य झाले आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सला कर्णधारपद एका मजबूत खेळाडूकडे सोपवायचे आहे. यासाठी डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ हे चांगले पर्याय आहेत. वॉर्नर हा अनुभवी खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांसोबतच त्याने आयपीएलमध्येही अप्रतिम कामगिरी केली आहे. दुसऱ्या बाजूला पृथ्वी आहे. तो तरुण असण्यासोबतच प्रतिभावानही आहे.

Rishabh Pant IPL 2023
Team India: BCCI ॲक्शन मोडमध्ये! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रोहित-द्रविडवर होणार मोठा निर्णय...

डेव्हिड वॉर्नर आयपीएल 2014 ते 2021 पर्यंत सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. त्यानंतर त्याला दिल्लीने आयपीएल 2022 साठी विकत घेतले. दिल्लीने वॉर्नरला 6.25 कोटी रुपयांना खरेदी केले. संघाने त्याला आयपीएल 2023 साठीही कायम ठेवले. त्याने आपल्या नेतृत्वाखाली हैदराबादला चॅम्पियन बनवले होते. त्यामुळे त्याला कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. याच कारणामुळे तो प्रबळ दावेदारही मानला जात आहे.

जर आपण युवा फलंदाज पृथ्वीबद्दल बोललो तर त्याने अंडर-19 क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. पृथ्वीचा अनुभव फारसा नसला तरी तो प्रतिभावान आहे. त्यामुळे कर्णधारपदासाठी दिल्ली पृथ्वीकडे वळण्याची शक्यता आहे. मात्र संघ काय निर्णय घेते हे पाहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com