चेंगदू (चीन) : जागतिक स्पर्धेत भारतीय कंपाउंड तिरंदाजांसाठी आजचा दिवस निराशाजनक ठरला असला, तरी युवा तिरंदाज ऋषभ यादवच्या ब्राँझपदकाने शनिवारी काही प्रमाणात दिलासा दिला. भारताची अव्वल मानांकित मिश्र दुहेरी जोडी मात्र पहिल्याच फेरीत पराभूत झाली..महिला गटातील कोणतीही स्पर्धक पदकापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे निराशेत आणखी भर पडली. १०वा मानांकित यादवने पुरुष वैयक्तिक कंपाउंडमधील ब्राँझपदक सामन्यात वरिष्ठ सहकारी आणि विश्वकरंडक सुवर्णपदक विजेत्या अभिषेक वर्माचा १४९-१४७ असा पराभव करून शानदार कामगिरी सादर केली..पहिल्या राउंडमध्ये ऋषभ यादवने सुरुवातीलच तीन ‘परफेक्ट १०’ केल्यामुळे पाचवा मानांकित अभिषेक वर्मा २९-३० असा मागे होता. दुसरा राउंड २९-२९ असा बरोबरीत सुटला, परंतु ऋषभकडे निसटती आघाडी कायम होती. तिसऱ्या राउंडमध्ये दोघांनी परफेक्ट १० केले, पण चौथ्या राउंडमध्ये अभिषेकचा एक गुण गेला आणि ऋषभने ११९-११७ अशी आघाडी वाढवली..निर्णायक क्षणी संयम राखत ऋषभने अखेरच्या राउंडमध्ये पुन्हा तीन परफेक्ट १० असे यश मिळवले आणि शेवटच्या नऊ बाणांमध्ये एकही गुण न गमावता विजय निश्चित केला. उपांत्य फेरीत ऋषभ यादवचा अमेरिकेच्या कर्टिस ली ब्रॉडनॅक्सकडून १४५-१४७ असा पराभव झाला, तर अभिषेक वर्मा अव्वल मानांकित नेदरलँड्सच्या माईक श्लोस्सरकडून १४५-१४८ असे पराभूत झाला. त्यामुळे या दोघांची ब्राँझपदकासाठी लढत झाली..Gautam Gambhir: गंभीर, गिलने सामनाधिकाऱ्यांचा इशारा धुडकावला; पाचव्या कसोटीत षटकांची गती कमी असल्याने चार गुणांची झाली असती कपात.भारतीय महिलांची वैयक्तिक कंपाउंडमधील मोहीम उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आली. १२वी मानांकित परनीत कौर हिला कोलंबियाच्या चौथ्या मानांकित अलेजांद्रा उस्क्वियानो हिने १४०-१४५ ने पराभूत केले, तर तिसरी मानांकित मधुरा धामणगावकर हिचा इस्टोनियाच्या सहाव्या मानांकित लिसेल जातमा हिने १४५-१४९ असा पराभव केला..हार विशेष चिंताजनक...सर्वात मोठा धक्का मात्र मिश्र दुहेरीतील कंपाउंड प्रकारात बसला. पात्रता फेरीत अव्वल ठरलेली भारतीय जोडी अभिषेक वर्मा आणि मधुरा धामणगावकर यांची जोडी यशस्वी ठरणार असे वाटत असताना प्रतिस्पर्धी दक्षिण कोरियाकडून पहिल्याच फेरीत पराभूत झाली.मून यीउन आणि ली युनहो यांच्या जोडीविरुद्ध भारतीयांना १५१-१५४ असा पराभव स्वीकारावा लागला आणि मोहीम संपुष्टात आली. या स्पर्धेत भारतीयांकडून रिकर्व्ह प्रकारात कोणतीही जोडी सहभागी झाली नाही..मिश्र दुहेरीत पहिल्या फेरीत कोरियन संघाने पहिला राउंड ३८-३७ असा जिंकला आणि दुसऱ्या राउंडमध्ये परफेक्ट स्कोअर करत आघाडी वाढवली. भारतीयांकडून या राउंडमध्ये २७ गुण मिळाल्याने ते चार गुणांनी मागे पडले. तिसरा राउंड ३७-३७ असा बरोबरीत संपला आणि शेवटचा राउंड भारतीयांनी ४०-३९ असा जिंकला, पण तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता.मिश्र दुहेरीतील ही हार विशेष चिंताजनक ठरली, कारण आठ संघांच्या ड्रॉमध्ये फक्त दोन विजय मिळवून पदक निश्चित करता आले असते. तसेच, मिक्स्ड कंपाउंड टीम इव्हेंट २०२८ लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये पदार्पण करणार आहे, या पराभवामुळे भारतीय तिरंदाजांच्या दबाव सहन करण्याच्या क्षमतेतील आणि रणनीतीतील कमतरता उघड केल्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.