Maharashtra Table Tennis Championship: परम, सारा यांना एकेरीत विजेतेपद; मुंबईतील राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत यश
Table Tennis: मुंबईतील खार जिमखान्यात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेत परम भिवंडकर व सारा जामसुतकर यांना विजेतेपद मिळाले. विविध वयोगटात राज्यभरातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.
मुंबई : टीएसटीटीएचा परम भिवंडकर आणि मुंबई शहरच्या सारा जामसुतकर यांनी मुंबईतील खार जिमखाना येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेत अनुक्रमे १५ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले.