ऑस्ट्रेलिया ओपनआधी; अ‍ॅडलेडच्या कोर्टवर बोपन्ना-रामकुमार जोडीचा डंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑस्ट्रेलिया ओपनआधी; अ‍ॅडलेडच्या कोर्टवर बोपन्ना-रामकुमार जोडीचा डंका

अंतिम सामन्यात भारताच्या जोडीने टॉप रँकिंगमध्ये असणाऱ्या डोडिंग आणि मार्सेलो मेलो यांना सरळ सेटमध्ये पराभूत केलं.

ऑस्ट्रेलिया ओपनआधी; अ‍ॅडलेडच्या कोर्टवर बोपन्ना-रामकुमार जोडीचा डंका

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेआधी भारताच्या रोहन बोपन्ना आणि रामकुमार रामनाथन यांनी अॅडलेडच्या कोर्टवर डंका वाजवला आहे. भारताच्या रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) आणि रामकुमार रामनाथन (Ramkumar Ramnathan) या पुरुष जोडीने रविवारी अॅडलेड आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली. त्यांनी इवान डोडिग आणि मार्सेलो मेले यांना पराभूत करून या स्पर्धेत बाजी मारली. बोपन्ना आणि रामकुमार यांनी बोस्नियाच्या टोमिस्लाव्ह बर्किच आणि मेक्सिकोच्या सेंटियागो गोंजालेज यांना हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती.

एटीपी टूरमध्ये पहिल्यांदा एकत्र खेळणाऱ्या रोहन बोपन्ना आणि रामकुमार यांनी रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात टॉप रँकिंगमध्ये असणाऱ्या डोडिंग आणि मार्सेलो मेलो यांना सरळ सेटमध्ये पराभूत केलं. एक तास २१ मिनिटं चाललेल्या या सामन्यात 7-6 (6), 6-1 अशा फरकाने त्यांनी विजय मिळवला. चारही ब्रेक पॉइंट वाचवून त्यांनी दोन वेळा प्रतिस्पर्ध्यांची सर्विससुद्धा ब्रेक केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaRohan Bopanna
loading image
go to top