
Rohan Jaitley Sexual Harassment : अरूण जेटलींच्या मुलावर लैंगिक छळाचे आरोप, पीडितेने जय शहांना केला मेल
Rohan Jaitley Sexual Harassment : दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. रोहन जेटली हे भारताचे माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचे पुत्र आहेत. त्यांच्याविरूद्ध जोत्स्ना सहानी नावाच्या महिलेने लैंगिक छळाचे आरोप करत बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.
विशेष म्हणजे पीडितेसाठी रूम बूक करताना DDCA चा निधी वापरल्याचा आरोप पत्रकार साक्षी जोशी यांच्या यूट्यूब चॅनवरून करण्यात आला आहे. पीडितेने आपल्या तक्रारीचा मेल हा बीसीसीआय सचिव जय शहा, अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना केला आहे.

पीडित जोत्स्ना सहानी यांनी बीसीसीआयकडे केलेल्या तक्रारीत लिहिले की, 'प्रीय सर / मॅम मला तुम्हाला डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी माझ्याविरूद्ध केलेल्या छळवणूक, अमानवीय आणि दुःखद कृतीबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे. माझ्या जिवीताला जेटली आणि त्यांच्या पत्नी मेहरूनिसा आनंद जेटली यांच्याकडून धोका आहे. पत्रात नमूद केलेली तथ्य आणि परिस्थितीने मला तुम्हाला पत्र लिहिण्यास भाग पाडले. तुम्ही जेटलींवर योग्य ती कारवाई करावी.'
रोहन जेटलींविरूद्ध कोणते आरोप करण्यात आले आहेत?
- पीडित महिलेने रोहन जेटलींवर लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.
- याचबरोबर पीडितेने रोहन जेटली यांनी डीडीसीएच्या निधीचा वैयक्तिक लाभासाठी वापर केल्याचा आरोप केला.
- पीडितेने रोहिन आणि त्याच्या पत्नीने रोहन यांच्याबरोबरचे नाते संपुष्टात आल्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप केला.
- डीडीसीए अध्यक्ष रोहन जेटलींवर पीडितेने पक्षपातीपणा आणि आपल्या मर्जीतील लोकांच्या नियुक्त्या केल्याचाही आरोप केला.
पीडितेने आपल्या तीन पानी इमेलमध्ये दोन अज्ञात लोकांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप केला आहे. यावेळी या दोन लोकांनी रोहनसोबतच्या रिलेशनशिपबद्दल कोणालाही सांगू नये यासाठी दम देखील दिला होता.
हेही वाचा : का वाढतात रिअल इस्टेटचे भाव?