पुणे जिल्हातून महाराष्ट्र केसरीसाठी रोहीत जावळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra kesari wrestling competition

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी माती विभागातून रोहीत जावळकर (ता. हवेली) याची निवड झाली. गादी विभागातून तुषार रायते (ता. दौंड) याची निवड झाली.

Maharashtra Kesari : पुणे जिल्हातून महाराष्ट्र केसरीसाठी रोहीत जावळकर

भुकूम - महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी माती विभागातून रोहीत जावळकर (ता. हवेली) याची निवड झाली. गादी विभागातून तुषार रायते (ता. दौंड) याची निवड झाली. जिल्हा कुस्तीगीर संघाचा महाबाली केसरीचा सन्मान ओंकार येलभर (ता. शिरूर) याने मिळविला.

भुकूम (ता. मुळशी) येथील ग्रामस्थांनी पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

माती व गादी विभागातून दहा गटात स्पर्धा झाल्या. ओंकार येलभर याने तेजस काळे (ता. इंदापूर) यास चुरशीच्या लढतीत पराभूत केले. स्व. वस्ताद रामभाऊ कारले यांच्या स्मरणार्थ त्यास चांदिची गदा देण्यात आली.यावेळी माती विभागात विजयी झालेले पहिलवान पुढील प्रमाणे. 97 कि. तेजस काळे (इंदापूर), 92 कि. बाबासाहेब तरंगे (इंदापूर), 86 कि. संतोष पडळकर (बारामती) 79 कि. शुभम शेटे (भोर), 74 कि. अरूण खेंगले (खेड), 70 कि. अनिल कचरे (इंदापूर) 65 कि. विकास लोणकर (बारामती), 61 कि. अमोल वालगुडे (वेल्हा), 57 कि. ओंकार निगडे (भोर) माती विभाग 97 कि.ओंकर येलभर (शिरूर), 92 कि. अभिजित भोईर (मुळशी), 86 कि. प्रतिक जगताप (पुरंधर), 79 कि. अक्षय चोरघे (हवेली), 74 कि. रणजित जाधव (इंदापूर), 70 कि. आबा शेंडगे (शिरूर) 65 कि. केतन घारे (मावळ), 61 कि. सनी केदारी (मावळ), 57 कि. स्वपनील शेलार (बारामती). भुकूम येथील माजी उपसरपंच सचिन आंग्रे, सचिन हगवणे, अंकुश खाटपे, निलेश ननावरे, माऊली आंग्रे, रामदास आंग्रे, राजेंद्र आंग्रे, अमोल आंग्रे, विशाल हगवणे, यांनी कुस्त्यांचे नियोजन केले.

यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदिप भोंडवे, हिंद केसरी योगेश दोडके, विलास कथुरे, पाडूरंग खाणेकर, मारूती आडकर, मेघराज कटके, शिवाजी तांगडे, चंद्रकांत मोहोळ यांनी कुस्त्यांचे निर्णय जाहीर केले.माजी उपमहापौर दिपक मानकर, नियोजन मंडळाचे माजी सदस्य राजाभाऊ हगवणे, माजी सभापती बाळासाहेब चांदेरे, रविंद्र कंधारे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, शांताराम इंगवले, बाबाजी शेळके, सचिन जांभूळकर उपस्थित होते. ग्रामस्थांनी कुस्ती आखाड्याचे चांगले नियोजन केले होते.