
पुणे: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही राज्यातील सर्वांत जुनी संघटना आहे. आज रविवारी (ता. २७) पुण्यात वारजे येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या समितीची निवडणूक झाली. यामध्ये आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.