Rohit Sharma : रोहितने डाईव्ह मारला अन् आऊट फिल्डकडे पाहत सोडलं मैदान; VIDEO होतोय व्हायरल

Rohit Sharma IND vs NZ
Rohit Sharma IND vs NZESAKAL

Rohit Sharma IND vs NZ : भारताचा कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने भारताला दोन विकेट्स काढून दिल्या. त्यामुळे भारतीय संघ दमदार सुरूवातीनंतर खूश होता.

मात्र भारताचा कर्णधार रोहित शर्माला 10 व्या षटकात मैदान सोडावं लागलं. तो एक चेंडू अडवण्याच्या नादात दुखापतग्रस्त झाला. ही दुखापत बळावू नये म्हणून त्याने त्वरित मैदान सोडले.

मात्र बाहेर जाण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धरमशाला स्टेडियमच्या आऊट फिल्डवर एक करडी नजर टाकली.

Rohit Sharma IND vs NZ
Mohammed Shami : चार सामने बेंचवर असलेल्या शमीने पहिल्याच चेंडूवर केला धमाका; कुंबळेला टाकलं मागं

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलने भारताच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. रोहित शर्मा दोन षटकानंतर मैदानावर परतला. मात्र हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या या स्टेडियमच्या खराब आऊट फिल्डचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उल हक दुखापतग्रस्त झाल्यानंतर धरमशालाच्या खराब आऊट फिल्डची चर्चा सुरू झाली होती. अफगाणिस्तानचा मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी आऊट फिल्डवर टीका करत मुजीब नशीबवान आहे त्याला मोठी दुखापत झाली नाही असे सांगितले.

Rohit Sharma IND vs NZ
IND vs NZ Live Score : रविंद्रने रविंद्रला दिले जीवनदान; अर्धशतक ठोकत रचिनने न्यूझीलंडची गाडी आणली रूळावर

आयसीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, 'सामनाधिकारी हे खेळपट्टी आणि आऊट फिल्डची तपासणी करण्याचं काम करतात. अफगाणिस्तान आणि बांगलादेश सामन्यानंतर धरमशाला येथील आऊट फिल्डला सुमार दर्जा देण्यात आला आहे. याचबरोबर आयसीसीचे स्वतंत्र खेळपट्टी सल्लागार आज आऊट फिल्डची तपासणी करणार आहेत.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com