ठरलं! कसोटी कॅप्टन्सीही रोहितकडेच!

Rohit Sharma
Rohit SharmaSakal

Sri Lanka Tourt Of India : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माकडे (Rohit Sharma) कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी संघाचा राजीनामा दिला होता. त्याच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. (Rohit Sharma appointed Test captain for the upcoming Sri Lanka series)

घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka series) होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे (Rohit Sharma) देण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता टी-20, वनडे आणि कसोटी तिन्ही क्रिकेट प्रकारात रोहित शर्माच टीम इंडियाचा सेनापती असणार आहे. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत उप कर्णधार पदाची धूरा ही जसप्रीत बुमराहच्या () खांद्यावर असेल. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना डच्चू देण्यात आला आहे.

Rohit Sharma
IPL 2022 : 'बॅट की बात विथ न्यू फ्रँचायझी अँण्ड CM योगी'

हे आहेत नवे चेहरे

प्रियांक पांचाळ, केएस भरत, सौरभ कुमार या नव्या चेहऱ्यांना कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्यांच्यासाठी जागा होणं मुश्किल दिसत असले तरी त्यांची संघात वर्णी लावत बीसीसीआयने वरिष्ठ खेळाडूंना इशाराच दिलाय. धमक दाखवा नाहीतर बाहेर बसा, असे चित्र पुढेही पाहायला मिळू शकते.

Rohit Sharma
Ranji Trophy : पहिला सामना खेळणाऱ्या मुंबईकरासमोर पुजारा 'झिरो'

श्रीलंका दौऱ्यासाठी असा आहे भारतीय कसोटी संघ

Team India Test Squad: रोहित शर्मा (Rohit Sharma) (c), मयांक अग्रवाल (Mayank Agarwal), प्रियांक पांचाळ, Priyank Panchal, विराट कोहली (Virat Kohli), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), हनुमा विहारी (Hanuma Vihari), शुबमन गिल (Shubman Gill), रिषभ पंत (Rishabh Pant), केएस भरत (KS Bharat), रविचंद्रन अश्विन Ravichandran Ashwin ( अंतिम निर्णय फिटनेसवर अवलंबून) , रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja), जयंत यादव (Jayant Yadav), कुलदीप यादव (Kuldeep Yadav), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) (vc), मोहम्मद शमी ( Mohammed Shami), मोहम्मद सिराज (Mohammed Siraj), उमेश यादव (Umesh Yadav), सौरभ कुमार (Saurabh Kumar)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com